Forest Department To Launch Grassland Safari In Pune Solapur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे:  पुणे वनविभाग पुणे (pune) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात (Pune forest department) आता गवताळ प्रदेश सफारी सुरु करण्यात येणार आहे.  वन विभागाने एक ऑनलाइन बुकिंग ऍप्लिकेशन विकसित केले आहे.  हे अॅप 18 ऑक्टोबर रोजी लॉन्च केलं जाणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे, असा दावा पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

वन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, एकूण क्षेत्रफळाच्या  2160.77 हेक्टर क्षेत्रापैकी 3.27 टक्के या वर्गवारीत विशेष गवताळ प्रदेश येतो. हा प्रदेश वन्य शाकाहारी आणि काळवीट, चिंकारा, ससा, भारतीय लांडगा, भारतीय कोल्हा, भारतीय कोल्हा यासारख्या मांसाहारी प्रजातींसाठी महत्त्वाच्या आहेत. विस्तीर्ण भागात पसरलेल्या, गवताळ प्रदेशात सफारीची क्षमता आहे. इंदापूर तहसीलमधील कडबनवाडी आणि बारामती तहसीलमधील शिर्सुफळ या दोन ठिकाणांपासून या गवताळ प्रदेशाच्या सफारीची सुरुवात होऊ शकते, असं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

इंदापूर आणि बारामती येथील गवताळ प्रदेशात एक चांगली आणि पोषक परिसंस्था आहे. या भागात अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. मात्र, या गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी पद्धतशीर दृष्टीकोन आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि संवर्धन कार्यक्रमात मानवी सहभाग वाढवणे. या क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी पर्यटन हा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मदतीने आणि स्थानिक गावांतील लोकांचाही सहभागाने वनविभागाने एक पद्धतशीर पर्यटन योजना विकसित केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिकांना व्यवस्थापन कौशल्ये आणि टूर गाइड्सचे प्रशिक्षण दिले जाते. लोकांना या गवताळ प्रदेशांना भेट देण्यासाठी दोन स्लॉट उपलब्ध असतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विस्तारासाठी योजना सुरू आहेत, असंही वन विभागाने सांगितलं. पूर्वी लोक या राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या प्रवेश करत असतं. संघटित पर्यटनामुळे वनविभागाला नागरिकांना आणि या ठिकाणांना भेट देऊ इच्छिणाऱ्या निसर्गप्रेमींना व्यवस्थित प्रवेश मिळण्यास मदत होईल, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि पर्यटकांनादेखील फायदा होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-            

OTT Release This Week : ‘काला पानी’ ते ‘अपलोड सीझन 3’; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार जबरदस्त सिनेमे अन् वेबसीरिज

[ad_2]

Related posts