Sex Championship Sweden has recognized sex as a sport and is preparing the worlds first championship

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sex Championship : आतापर्यंत तुम्ही क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळांच्या चॅम्पियनशिपबद्दल ( Sports Championship ) ऐकलं असेल… मात्र तुम्ही कधी सेक्स चॅम्पियनशिपबाबत ( Sex Championship ) ऐकलंय का? हे ऐकूनच तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर हो…सेक्स चॅम्पियनशिप होणार आहे आणि ती देखील स्विडन ( Sweden ) देशामध्ये. यंदाच्या वर्षीच ही चॅम्पियनशिप ( Sex Championship ) आयोजित केली जाणार आहे. नेमकी ही चॅम्पियनशिप काय असणार आहे, याची माहिती घेऊया.

स्विडनमध्ये नुकतंच सेक्सला खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याचसोबत स्विडन पहिली यूरोपीय सेक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहे. याशिवाय स्वीडन हा सेक्सची खेळ म्हणून नोंदणी करणारा पहिला देश ठरलाय.

या चॅम्पियनशिपचं आयोजन स्विडन सेक्स फेडरेशन करणार आहे. ही युरोपीय सेक्स चॅम्पियनशिपची सुरुवात 8 जूनपासून होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक दिवशी स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे.

या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना संबंधित सामने किंवा क्रियाकलापांना उपस्थित राहण्यासाठी अंदाजे 45 मिनिटं ते एक तास मिळू शकणार आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपसाठी आतापर्यंत विविध देशांतील 20 स्पर्धकांनी अर्ज केले असल्याची माहिती आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे विजेते हे तीन ज्यूरी आणि प्रेक्षक रेटिंगद्वारे ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांच्या म्हणण्याप्रमाणे, सेक्सला खेळात बदलणं ही काळाची बाब होती. सेक्सच्या माध्यमातून लोक मानसिक आणि शारीरिक आरोग्य योग्य पद्धतीने जपू शकतात. त्यामुळे यासाठी तयारी आवश्यक आहे.

इतर कोणत्याही खेळाप्रमाणेच याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. हा पहिला खेळ आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला भरपूर आनंद मिळू शकणार आहे. इतर सर्व खेळांमध्ये जर पराभव झाला तर समोरचा प्रतिस्पर्धी नाराज असतो. मात्र यामध्ये तसं घडणार नाही. यामध्ये प्रतिस्पर्धीवरून तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळू शकणार आहेत, असंही ब्रॅटिच म्हणाले.

Related posts