PMPML News PMPML Drivers And Conductors Checked Through Breathalyser Before Duty In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : मागील काही दिवसांपासून PMPML बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं असल्याची माहिती आहे. त्यामुळेच आता बसचालकांच्या आणि कंडक्टर यांच्या संदर्भात PMPML प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) बस चालक आणि वाहकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करूनच कामावर उपस्थित रहा, असे आदेश पीएमपीएमएलतर्फे देण्यात आले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात 1750 बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलची सेवा दिली जाते. दररोज साधारण लाखो प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या कात्रजवरून बोपदेव घाटमार्गे भिवरी, गराडेमार्गे जाणाऱ्या बसला बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर चालकास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची ड्यूटी द्यावी, असे आदेश काढण्यात आले.  

कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिले आहेत. चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

सुरुवातीला PMPML बस चालक आणि कंडक्टरची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी व्हायची मात्र काही दिवसांपूर्वी ही तपासणी होत नसल्याचं समोर आलं.  नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या होत्या. त्यानंतर हा ब्रेथ ॲनालायझर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

अपघाताच्या संख्येत दुपटीनं वाढ

PMPML अपघाताच्या संख्येत आणि यात होणाऱ्या मृत्यूच्या आकडा दुपटीने वाढला असल्याचं समोर आलं आहे. बसचे एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान 59 अपघात झाले होते. यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर 2023 मध्ये हा आकडा दुपटीने वाढला आहे. पीएमपीचे एकूण 75 अपघात झाले. यात 19 जणांचा मृत्यू झाला. चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ब्रेथ ॲनालायझर  त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

PMPML चालकांना सूट?

पीएमपीचे चालक सिग्नल जम्पिंग, भरधाव वेगाने बस चालविणे, झेंब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. पण, सर्वसामान्य वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जो कारवाईचा दंडुका उगारला जातो. तो मात्र पीएमपी चालकांच्या बाबत उगारल्याचे दिसून येत नाही.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar Pune: कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला; अजित पवारांची टीका

[ad_2]

Related posts