[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…
कर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला चाप; सकाळी 8 आधी, संध्याकाळी 7 नंतर कर्जदारांशी संपर्क करु नये, RBIचा नवा नियम
RBI Rules for Loan Recovery: रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही. धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत. वाचा सविस्तर
Asian Games 2023: भारताच्या रमन शर्माची ऐतिहासिक भरारी, पुरुषांच्या 1500 मीटर T38 स्पर्धेत पटकावलं सुवर्ण
Asian Games 2023: भारतीय पॅरा अॅथलीट रमन शर्मा (Raman Sharma) यानं चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 (Asian Para Games 2023) मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर T38 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी नवा आशियाई आणि क्रीडा विक्रम रचला. रमण शर्मानं 4:20.80 मिनिटांत शर्यत पूर्ण करून अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. रमनच्या या पराक्रमामुळे भारताच्या क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या आता 20 झाली आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला रमनपूर्वी तिरंदाज शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड खुल्या स्पर्धेत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदाचा 144-142 नं पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. वाचा सविस्तर
Petrol-Diesel Price: शेअर मार्केट गडगडलं, पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार? आजचे दर जाहीर, झटपट चेक करा
Petrol-Diesel Price Today: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळतेय, गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी रुपये बुडाले असल्याची माहिती मिळतेय. अशातच याचा परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही बदलणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर
टाटा समुहाचा हा स्टॉक 3-5 महिन्यांसाठी खरेदी करा, होईल भरपूर नफा; टार्गेट-स्टॉपलॉससह संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या!
Tata Group Stocks to BUY: शेअर बाजाराची (Share Market) सेंटिमेंट निगेटिव झाल्याचं पाहायला मिळत आहे. सलग सहा ट्रेडिंग सत्रांत घसरणीसह शेअर बाजार (Stock Market) बंद होत आहे. या घसरणीची दोन मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे, इस्रायल-हमास युद्ध आणि दुसरं कारण म्हणजे, अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढती ताकद. अशा वातावरणात, शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी, ब्रोकरेजनं पुढील 3-5 महिन्यांसाठी टाटा समूहाची हॉटेल कंपनी इंडियन हॉटेल्सची निवड केली आहे. हा शेअर 375 रुपये (Indian Hotels Share Price) आहे. जाणून घेऊयात या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संपूर्ण स्ट्रॅटर्जी… वाचा सविस्तर
World Cup 2023 Points Table: इंग्लंड सेमीफायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, पॉईंट टेबलची आकडेवारी पाहा
World Cup 2023 Points Table Updated After ENG vs SL: वर्ल्डकप 2023 च्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा (England) 8 विकेट्सनी एकतर्फी पराभव केला. श्रीलंकेच्या (Sri Lanka Beat England) या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. विजय मिळवून श्रीलंकेनं इंग्लंडला जेतेपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर काढल्यातच जमा आहे. तसेच, यामुळे पाकिस्तानच्या अडचणीही वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या धमाकेदार विजयानंतर श्रीलंका पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर तर पराभूत झालेला गतविजेता इंग्लंडचा संघ थेट नवव्या क्रमांकावर घसरला आहे. वाचा सविस्तर
27 October In History : पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म, संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन; आज इतिहासात
मुंबई : देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन (K. R. Narayanan) यांचा आज जन्मदिन. तसेच आजच्याच दिवशी कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म झाला होता. 27 ऑक्टोबर 1937 मध्ये किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन झाले. 1795 मध्ये अमेरिका आणि स्पेनमध्ये करार, मिसिसिपी नदीमध्ये वाहतुकीला परवानगी . शिलाई मशिनचा शोध लावणाऱ्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म झाला होता. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार तयार करण्यात आली होती. 2021 अग्नी 5 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले. वाचा सविस्तर
Horoscope Today 27 October 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी पैशाचे व्यवहार टाळावेत, 12 राशीचे आजचे राशीभविष्य.
Horoscope Today 27 October 2023 : आज 27 ऑक्टोबर 2023, शुक्रवार, जन्मकुंडलीनुसार आज म्हणजेच 27 ऑक्टोबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीचे लोक आज खूप चिंतेत राहतील. वृश्चिक राशीच्या लोकांना देवाचा आशीर्वाद असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर
[ad_2]