काचेचा ब्रीज अचानक फुटला, 30 फूट खाली कोसळले लोक; अंगावर शहारे आणणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इंडोनेशियात काचेचा ब्रीज फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रीज फुटल्याने 11 पर्यटक तब्बल 30 फूट खाली कोसळले आहेत. हा ब्रीज 10 मीटर लांब असून, त्याला दोन सोनेरी हातांनी पकडलेलं दाखवण्यात आलं आहे. अंगावर शहारे आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खाली पडलेल्या पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते. यादरम्यान ब्रीजवरील अनेक काचा फुटण्यास सुरुवात झाली. दुर्घटना घडली तेव्हा ब्रीजवर 11 पर्यटक होते. यामधील दोघेजण 30 फूट खाली कोसळले. व्हिडीओमध्ये पर्यटक पुन्हा एकदा ब्रीजवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दोघेजण खाली पडलेले दिसत आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. 

पर्यटकांना पडताना पाहून काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता कामगारांना काच फुटल्याचा आवाज ऐकू आला. या दुर्घटनेनंतर, बन्युमास शहराचे पोलीस प्रमुख Edy Suranta Sitepu यांनी पडलेल्यांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तसंच तिघेजण जखमी आहेत. 

या ब्रीजच्या सुरक्षेसंबंधी सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. द जकार्ता पोस्टनुसार, लिम्पाकुवस पाइन फॉरेस्ट कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष इकोप पूर्णोमो यांनी यापूर्वी एप्रिलमध्ये जिओंग ब्रिजच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला होता. द जकार्ता पोस्टनुसार, Limpakuwus Pine Forest Cooperative चे अध्यक्ष इकोप पूर्णोमो यांनी एप्रिलमध्ये जिओंग ब्रिजच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला होता. त्यांनी ब्रीजच्या सुरक्षेचं मूल्यांकन करायचं असल्याचं सांगितलं होतं. 

अध्यक्षांनी दावा केला आहे की पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्यांपैकी 5 टक्के लोकांनी ऑनलाइन नकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर ही जागा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करणार आहेत. 

Related posts