Google Maps Shows Bharat With Indian Flag For India Map Country In South Asia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bharat on Google Maps : केंद्र सरकारने नुकतेच देशाचं नाव बदलून ‘भारत’ करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. यावरूनच राजकारणंही तापलं आहे. दरम्यान, देशाचं अधिकृत इंग्रजी नाव बदलून इंडिया (India) ऐवजी भारत (Bharat) असं करण्यात आलेलं नाही. पण गुगल मॅप (Google Maps) ने भारताचं (India) नवं चर्चित नाव भारत (Bharat) स्वीकारलं असल्याचं दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे जर तुम्ही गुगल मॅप (Google Maps) च्या सर्च बॉक्स (Search Box) मध्ये भारत टाइप केला तर, तुम्हाला तिरंगा ध्वज दिसेल, ज्यावर दक्षिण आशियातील एक देश (Country in South Asia) असं लिहिलेलं दिसेल.

गुगल मॅपवर देशाचं नाव बदललं

तुम्ही गुगल मॅपवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत भारत लिहिल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही ‘भारत’ शब्द हिंदी किंवा इंग्रजीमध्ये गुगल (Google) तुम्हाला परिणाम म्हणून भारत दाखवेल. गुगल मॅप (Google Maps) ने भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ (A country in South Asia) म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे, जर वापरकर्त्यांना भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये गुगल मॅपवर भारत किंवा भारत लिहून करू शकतात.

गुगल मॅपची यंत्रणा कशी काम करते?

गुगल मॅपमध्ये हिंदी भाषेत तुम्ही भारत टाइप केल्यास तुम्हाला भारताच्या नकाशासोबत ठळक अक्षरात ‘भारत’ लिहिलेलं दिसेल. त्याच बरोबर तुम्ही गुगल मॅपमध्ये इंग्रजीत भारत लिहिल्यास सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला देशाच्या नकाशासोबत भारत लिहिलेले दिसेल. म्हणजे गुगल मॅपही भारताला इंडिया आणि भारत अशा दोन्ही नावांनी स्वीकारत आहे. केद्र सरकार देशाच नाव बदलण्याच्या तयारीत व्यस्त असताना, गुगलने आधीच आपलं काम सुरू केलं आहे.

गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

गुगल मॅपवरच नाही तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्मवरही जर भारत आणि इंडिया लिहिलं तरी त्याचे सर्च रिझल्ट अगदी सारखेच दिसत आहेत. जर युजर्स गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिल्यावर तुम्हाल एकसारखीच उत्तरं दिसत आहेत. मात्र, याबाबत गुगलकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts