Air Quality Becomes Serious In Delhi-NCR AQI Crosses 400 In Many Areas Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. ज्यामुळे फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) 400 चा टप्पा ओलांडला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता. त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा या पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं की, “वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळा पुढील 2 दिवस बंद राहतील. प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे  हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे. लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीतील ‘या’ भागात हवेची गुणवत्ता गंभीर 

गुरुवारी दिल्लीतील अनेक भागात हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली. यापैकी पंजाबी बागेत AQI 439, द्वारका सेक्टर-8 मध्ये 420, जहांगीरपुरीमध्ये 403, रोहिणीमध्ये 422, नरेलामध्ये 422, वजीरपूरमध्ये 406, बवानामध्ये 432, मुंडकामध्ये 439, आनंद विहारमध्ये 452 आणि आनंद विहारमध्ये 452 अशी नोंद करण्यात आली आहे. 

आठवडाभर दिल्लीचा AQI कसा होता?

दिल्लीचा AQI दिवसा 3 वाजता 378 वर पोहोचला होता. त्याच वेळी, 24 तासांची सरासरी AQI बुधवारी 364, मंगळवारी 359, सोमवारी 347, रविवारी 325, शनिवारी 304 आणि शुक्रवारी 261 नोंदवण्यात आली.

हेही वाचा : 

ED Bribe Case : भ्रष्टाचाऱ्यांना घाम फोडणाऱ्या ईडीचा अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक



[ad_2]

Related posts