( प्रगत भारत । pragatbharat.com)
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह हा ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतो. काही ग्रह हे एकमेकांचे शत्रू असतात. तर काही ग्रहांच्या मिलनाने शुभ राजयोग तयार होतो. पण शत्रू ग्रह एकत्र आल्यास तुमच्या कुंडलीत अशुभ योग तयार होतो. आज आपण कुंडलीतील विष योग आणि कालसर्प योगाबद्दल जाणून घेणार आहोत. (what is kalasarpa yog and visha yoga impact of the life and solutation upay Astrology news in marathi )
विष योग म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनि आणि चंद्र यांची भेट होते तेव्हा जाचकच्या कुंडलीत विष योग तयार होतो. शनि देव हा कर्मचे फळ देतो. दर अडीच वर्षाने शनि आपलं घर बदलतो. तर चंद्र हा सव्वा दोन दिवसांने आपलं स्थान बदलतो.
विष योगाचा प्रभाव?
ज्याचा कुंडलीत विष योग तयार होतो त्याला विचित्र मानसिक त्रास होतो. चांगल्या वाईट गोष्टींचं त्याला भान राहत नाही. अशात तो अविचारी निर्णय घेतो आणि स्वत:चं नुकसान करुन घेतो.
विष योग निवारण्यावर उपाय
या जाचकाने दररोज शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.
मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करावं.
सोमवारी आणि शनिवारी शिव शंकर आणि शनि महाराजांची पूजा करावी.
शिव चालिसाचं पठण करावं.
कालसर्प योग म्हणजे काय?
आता आपण जाणून घेणार आहेत कालसर्प योग कसा तयार होतो ते. ज्योतिषशास्त्रात अभ्यासकांनुसार कुंडलीत जेव्हा राहू आणि केतू हे दोन ग्रह समोरासमोर येतात तेव्हा कालसर्प योग तयार होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कालसर्प योगाचे एकूण 12 प्रकार आहेत. अनंत कालसर्प योग, कुलिक कालसर्प योग, वासूकी कालसर्प योग, शंखपाल कालसर्प योग, पद्म कालसर्प योग, महापद्म कालसर्प योग, तक्षक कालसर्प योग, कर्कोटक कालसर्प योग, शंखचुड कालसर्प योग, घातक कालसर्प योग, विषधर विषाक्त कालसर्प योग आणि शेषनाग कालसर्प योग असे त्याची नावं आहेत.
कालसर्प योगचा प्रभाव
या व्यक्तीला वेळवेगळ्या मार्गाने येणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो. कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. सतत चिडचिड होते. पती पत्नीमध्ये नेहमी भांडण होतात.
कालसर्प योग निवारण्यासाठी उपाय
पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर घरात मोरपंखीचा मुकुट घातलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणा. त्याची पूजा अर्चा करुन स्थापना करा.
पलाशचं फूल गोमूत्रात बुडवून त्याचे बारीक चूर्ण करून वाळवा. आता हे पावडर आणि चंदनाची पावडर मिक्स करा. त्यानंतर ही पावडर शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय 21 दिवस करा. तुमची नोकरीची समस्या या उपायाने दूर होईल.
रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी दररोज भगवान शंकराची पूजा करा.
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दुधात भांग मिसळून शिवलिंगावर अर्पण करा.