Gold Silver Rate Today Are Down And You Can Buy Gold Jewellery For Wedding Season 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver Rate: काही दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. हा खरेदीरांना मोठा दिलासा आहे. त्यामुळं तुम्ही धनत्रयोदशी आणि लग्नाच्या हंगामात सोन्याची खरेदी करु शकता.

देशातील पाच दिवसांचा दिवाळी सण 10 नोव्हेंबर 2023 पासून म्हणजेच या शुक्रवारपासून सुरू होत आहे. धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदीला मोठा मान असतो. धनत्रयोदशीच्या आधी, आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातू फ्युचर्स मार्केट आणि किरकोळ सराफा बाजारात स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आगामी सण आणि लग्नसराईसाठी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये किमती किती कमी झाल्या?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याच्या किमती 200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. MCX वर सोने 242 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याचा दर 60 हजार 778 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या या किंमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत. किरकोळ बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. किरकोळ बाजारातही आज सोने स्वस्त झाले असून येथील बाजारात सोने 120 ते 170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या कमी दराने उपलब्ध आहे.

चांदीची किंमत काय? 

चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. MCX वर चांदी 98 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 72 हजार 154 रुपये प्रति किलो आहे. या किमती डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर

दिल्ली – सोने 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे.
मुंबई – मुंबईत सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
कोलकाता – सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चेन्नई – सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 62180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही सोन्याचे दर कमी 

अहमदाबाद – सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
बेंगळुरू –  सोने 150 रुपयांनी स्वस्त होऊन 61470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चंदीगड – सोने कोणत्याही बदलाशिवाय 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे.
हैदराबाद –  सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
जयपूर –  सोने कोणत्याही बदलाशिवाय 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे.
लखनऊ – सोने 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​कोणतेही बदल न करता आले आहे.
पाटणा – सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
सूरत – सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61520 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Diwali 2023 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? तर, ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; फसवणूक होणार नाही

[ad_2]

Related posts