Post Office Best Saving Schemes Ever Invest In Time Deposit And Earn Lakhs From Interest Know More Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) लहान मुलं आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना (Saving Schemes) चालवल्या जातात. यापैकी एक विशेष योजना गुंतवणूकदारांना केवळ व्याजाद्वारे लाखो कमावण्यास मदत करतेय. तुम्हाला या योजनेबाबत माहिती आहे का? चिंता करू नका, आम्ही सांगतो. आम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमबद्दल (Post Office Time Deposit Scheme) बोलत आहोत. या पंचवार्षिक योजनेत तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच तुम्हाला मोठा रिटर्नही मिळतो. यामुळे, ही योजना पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. 

7.5 टक्के व्याज 

आपल्यापैकी अनेकजण आपल्या कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवतात (Saving). पण ही गुंतवणूक (Investment) सुरक्षित आणि मोठा परतावा देणारी असावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशावेळी सर्वात पहिली पसंती पोस्ट ऑफिसच्या योजनांना दिली जाते. पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजना आता खूप लोकप्रिय ठरत आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमबद्दल (Post Office Time Deposit Scheme ) बोलायचं झालं तर, ही योजना व्याज आणि उत्तम फायदे देखील देते. या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारं व्याज 7.5 टक्के आहे.

एप्रिलमध्ये व्याजदरात बदल 

अल्पबचत योजनांचं (Govt Small Saving Schemes) व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी सुधारित करतं आणि 1 एप्रिल 2023 रोजी या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध व्याजदरात सुधारणा करण्यात आली होती. हा व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आला. या व्याजदरासह, ही पोस्ट ऑफिस योजना सर्वोत्तम बचत योजनांपैकी एक आहे कारण, हमी मिळकतीमुळे ती गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणं शक्य 

गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल आणि पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये (Time Deposit Scheme) 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल. मात्र, ग्राहकाची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

व्याजातून 2 लाखांपेक्षा जास्त कमाई 

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांच्या पैशाच्या दुप्पट होण्याच्या हिशोबावर विचार केला, तर समजा एखाद्या ग्राहकानं पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले आणि त्याला त्यावर 7.5 टक्के व्याज मिळतं, तर या कालावधीत त्याला 2 लाख 24 हजार 974 रुपयांचं व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या रकमेसह एकूण मॅच्युरिटीची रक्कम 7,24,974 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच, या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला लाखो रुपयांचा हमखास फायदा मिळू शकतो.

तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो

टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचं खातं त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येतं. यामध्ये किमान 1 हजार रुपयांमध्ये खातं उघडता येतं. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वर्षभरानं जोडले जातात.

[ad_2]

Related posts