( प्रगत भारत । pragatbharat.com)
Russian Family Died: जगात कोणी कितीही श्रीमंत, नशिबान असूदे पण कोणालाच स्वत:च्या मृत्यूविषयी सांगता येत नाही. असे म्हणतात मृत्यू येणारच असेल तर तो कोणत्याही कारणाने येतो. एक कुटुंब संपण्यास बटाटा निमित्त ठरला. हो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण भारतीय भाजी, चिप्सच्या स्वरुपात रोज बटाटे खात असतो. भारतीय खाद्यपदार्थात, प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे असतात.
पण हाच बटाटा रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या घातकी बटाट्यामुळे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ही दुर्देवी घटना 2014 साली घडली. ज्यात बटाट्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आणि आजुबाजूचा परिसर हादरला. सुदैवाने कुटुंबात एकच मुलगी जिवंत राहिली. यामागे कोणते कट कारस्थान नव्हते. त्यांना कोणी विषारी अन्न खायला दिले नव्हते. बटाटा सर्वांच्या मृत्यूचे कारण ठरला. एका रशियन कुटुंबाने त्यांच्या घराच्या तळघरात भरपूर बटाटे साठवले होते. हा बटाटा बाहेर काढण्यासाठी घरातील सदस्य आत गेले. यानंतर नको ती घटना घडली. यावेळी बटाट्यातून सोडलेले विष हवेत पसरले आणि जीव घेतला.
कुजलेले बटाटे प्राणघातक
साठवलेले बटाटे हे सर्वांच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे तपासात समोर आले आहे. हे रशियन कुटुंब भरपूर बटाट्यांचा साठा करत असे, असे सांगण्यात आले. बटाटे गोळा करण्यासाठी कुटुंबातील एक सदस्य गेला तो जिवंत बाहेर आलाच नाही. सडलेल्या बटाट्यातून गॅस बाहेर आल्याने त्याचा जीव गुदमरला. कुजलेल्या बटाट्यातून निघणारा हा वायू इतका विषारी होता की, श्वास घेताच प्रत्येकाला जीव गमवावा लागला.
कुटुंबातील मुलगी मारियाचा जीव वाचला कारण तळघरात येण्यापूर्वी तिच्या आजीने दरवाजा उघडा ठेवला होता. मारिया खोलीत येण्यापूर्वी विषारी वायूचे प्रमाण कमी झाले होते.
नुकतीच या कुटुंबाची शोकांतिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. याद्वारे लोकांना चुकूनही बटाटे बंद खोलीत ठेवू नयेत, अन्यथा असा अपघात होऊ शकतो याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही पदार्थाची साठवणूक करताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.