‘इथं’ अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World News : जगात अनेक प्रांत, अनेक देश आणि तितकेच असंख्य नागरिक राहतात. प्रांताप्रांतानुसार फक्त भाषा आणि संस्कृतीच बदलत नाही, तर चालीरिती आणि रुढी परंपराही टप्प्याटप्प्यानं बदलत जातात. याचं सोपं उदाहरण पाहायचं झाल्यास देशादेशातील लग्नसंस्थांविषयी जाणून घेणं एक उत्तम पर्याय ठरतो. कारण, देशातील संस्कृतीचं दर्शन याच विवाहसंस्थेतून पाहायला मिळतं. भारताचंच उदाहरण घेतलं तर इथं लग्न म्हणजे एक अदभूत सोहळा. पूजाविधी, ब्राह्मणांचं योगदान आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद, असंच चित्र इथं पाहायला मिळतं. पण, परदेशात मात्र हे चित्र पूर्णपणे बदलतं. 

लग्न म्हटलं की सहजीवन, एकमेकांना दिली जाणारी साथ, समजुतदारपणा आणि तडतोड अशा गोष्टी हमखास येतात. पण, जगात एक असाही देश आहे जिथं लग्नाबाबत अशा परंपरा आहेत ज्या पाहून तुम्हीही हैराण व्हाल, कारण इथं लग्न अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं. 

कुठं अवघे 24 तास टिकतं लग्न? 

भारताचं शेजारी राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या चीनमधील काही भागांमध्ये लग्नाला फक्त 24 तासांसाठीच मान्यता मिळते. माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हलाखीच्या परिस्थितीमुळे जे कुटुंबीय त्यांच्या सुनेला भेट स्वरुपात पैसे देण्यास असमर्थ असतात त्यांचं लग्नच होत नाही. अशा परिस्थितीत येथील मुलं वेगळ्याच पद्धतीनं लग्न करतात. जेणेकरून या मुलांना विवाहित गणलं जाईल. 

चीनच्या ग्रामीण भागांमध्ये अशा पद्धतींची लग्न पार पडतात. जिथं हे लग्नाचं नातं अवघ्या 24 तासांसाठीच टीकून राहतं. या लग्नसोहळ्यांसाठी कोणत्याही मोठ्या समारंभाचं आयोजन करण्यात येत नाही. पाहुण्यांनाही आमंत्रण जात नाही. अतिशय गोपनीय स्वरुपात पार पडणाऱ्या अशा लग्नसोहळ्यांचं प्रमाण मागील 6 वर्षांमध्ये वाढल्याचं सांगण्यात येतं. 

एका दिवसाच्या लग्नामागे कारण काय? 

चीनमध्ये लग्नासाठी येणारा खर्च आर्थिक भार देणारा असल्यामुळं अनेक युवक अविवाहित राहत आहेत. मात्र , चीनच्या संस्कृतीनुसार मुलांनी अविवाहित राहणं शुभ नाही. यामुळं एकटंच असण्याची आपली ओळख ही मुलं मिटवू पाहण्यासाठी म्हणून हे एका दिवसाचं लग्न करतात. या एका दिवसाच्या लग्नासाठी ज्या मुली वधू म्हणून तयार होतात त्यांना प्रचंड पैसे दिले जातात. थोडक्यात चीनमध्ये विवाहसंस्कृतीकडेही नफा- तोट्याच्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे ही बाब नाकारता येणार नाही. 

Related posts