india anju retured to india after six month from pakistan

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anju Return: राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतलीय. तिचा एक फोटोही समोर आला असून वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर  फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी (Nasrullah) लग्न केलं. पाकिस्तान (Pakistan) गेल्यानंतर अंजू जगभरात चर्चेत आली. भारतात परतल्यानंतर अंजू (Anju) सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पण सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अंजूचा पहिला पती अरविंद तिचा स्विकार करणार का? अरविंद आणि अंजूला दोन मुलं आहेत, पण पती आणि दोन मुलांना सोडून ती पाकिस्तानात गेली होती.

नसरुल्लाहशी केला निकाह
अंजू ही राजस्थानच्या अलवरमध्ये राहाते. अलवरमधल्या भिवाडी इथं अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राहत होती. अंजू आणि अरविंदचं 17 वर्षांपूर्वी अरेंज्ड मॅरेज झालं. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलीचं वय 15 थर लहान मुलाचं वय 7 वर्ष आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात गेली. पाकिस्तानामधल्या खैबर पख्तूनख्वामध्ये मित्र नसरुल्लाहबरोबर अंजूचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी निकालही केला. अंजू-नसरुल्लाहचे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले होते. अंजू आणि नसरुल्लाहाच्या प्री वेंडिगचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पाकिस्तानमध्येच हा व्हिडिओ शूट करण्यात आला.

पाकिस्तानात स्विकारला इस्लाम
अंजू जुलैमध्ये फेसभूक फ्रेंड नसरुल्लाहला भेटायला पाकिस्तानात गेली. 34 वर्षांच्या अंजूने नसरुल्लाहशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्विकारला आणि नावही बदललं. अंजूने आपलं नाव फातिमा असं ठेवलं. 

पतीशी खोटं बोलून पाकिस्तानात
पाकिस्तानला जाण्यासाठी अंजूने आपल्या पती अरविंदला खोटं कारण सांगितलं होतं. जयपूरमध्ये एका मैत्रिणीला भेटायाल जात असल्याचं सांगून अंजू घरातून निघून गेली होती. तर ज्या कंपनीत अंजू काम करत होती, तिकडे तीने गोव्याला बहिणीकडे जात असल्याचं सांगितलं होतं.  पण नंतर मीडियात बातम्या आल्यानंतर अंजू जयपूरला न जाता पाकिस्तानला गेल्याचं अरविंदला कळलं. 

Related posts