Why ECI reschedules vote counting for Mizoram Assembly elections to December 4 Know the reason In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ECI reschedules vote counting for Mizoram : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) मिझोराम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत मोठा बदल केला आहे. मिझोरामची मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आली असून आता 4 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला? त्याचं नेमकं कारण काय? पाहुया…

कमिशनला 3 डिसेंबर, 2023 पासून मतमोजणीची तारीख बदलून इतर काही आठवड्याच्या दिवसात बदल करण्याची विनंती करणारे विविध स्तरांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत, कारण 3 डिसेंबर 2023 हा रविवार मिझोरामच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आयोगाने या निवेदनांचा विचार करून मिझोराम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत 4 डिसेंबर 2023 (सोमवार) सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, असं भारतीय निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

मिझोराम विधानसभेच्या 40 सदस्यीय निवडीसाठी 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (MNF) झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM), काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झालं आणि राज्यात 80.66 टक्के मतदान झालं होतं.

दरम्यान, मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट बहुमताचा आकडा गाठू शकते, असा अंदाज आहे. मिझोराममध्ये एकूण 40 जागा असून यापैकी 28 जागा एकट्या एमएनएफला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि भाजपाला सिंगल आकड्यांवर समाधान मानावं लागेल. 

मिझोराममध्ये सद्यस्थिती
एकूण जागा – ४०
एमएनएफ – २८
झेडपीएम – ६
काँग्रेस – ५
भाजप – १

CNXच्या एक्झिट पोलनुसार  
MNF- 14-18
भाजप- 00-02 
काँग्रेस 8 – 10
अन्य- 12-16 

जन की बात एक्झिट पोलनुसार, 
एमएनएफ – 10 -14
झेडपीएम – 15-25
काँग्रेस – 5-9
भाजप – 0-2

एबीपी सी व्होटर
एमएनएफ – 15-21
झेडपीएम – 12-18
काँग्रेस – 2-8
अन्य – 0-5

Related posts