तुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग ‘या’ टिप्स वापरा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Matte Lipstick Remove : लिपस्टिक हा महिलांच्या मेकअप किटचा सर्वात महत्वाचा भाग आहे. बहुतेक स्त्रियांना या जवळजवळ दररोज लिपस्टिक वापरतात. त्यात ती लिपस्टिक खूप वेळ टिकून राहण्यासाठी अनेक महिला मॅट लिपस्टिक लावणे पसंत करतात. मॅट लिपस्टिक लावणे सोपे असले तरी काही वेळा काढणे मात्र, कठीण होते. त्यामुळे कशा प्रकारे मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही काय करू शकतात असा प्रश्न अनेकांना बऱ्याचवेळा पडतात. अशात आज आपण काही टिप्स घाणून घेणार आहोत. ज्यांच्या मदतीनं मॅट लिप्सिट काढण सोप होईल.

मॅट लिपस्टिक काढण्यासाठी काही खास टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. 

खोबरेल तेल वापरा: ओठांवरची मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी चमच्यानं थोडं खोबरेल तेल घेऊन बोटाने ओठांवर लावा. एक मिनिटानंतर, मऊ कापड किंवा कापसाने मॅट लिपस्टिक पुसनं करा. यामुळे ओठ लगेच स्वच्छ होतील आणि ओठांचा मुलायमपणाही वाढेल.

ऑइल क्लींजर वापरा: मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही ऑइल क्लींजर वापरू शकता. यासाठी ऑइल क्लीन्झरमध्ये कापूस बुडवून ओठांवर हळू हळू पुढे मागे करत पुसा आणि नंतर पाण्यानं धूवून काढा. याने लिपस्टिक सहज स्वच्छ होईल आणि ओठांचा ओलावा कायम राहील.

मायसेलर क्लींजिंग वॉटर : ​​तुम्ही लिपस्टिक काढण्यासाठी मायसेलर क्लींजिंग वॉटर वापरू शकता. यासाठी कापूस बुडवून किंवा मायसेलर पाण्यात पुसून ओठा हळूच पुसून काढा. यामुळे लिपस्टिक सहज निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.

पेट्रोलियम जेली वापरा: लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेली वापरू शकता. यासाठी ओठांवर पेट्रोलियम जेली लावा. थोड्या वेळाने पेपर नॅपकिनच्या मदतीने लिपस्टिक काढून टाका. जर जमत असल्यास, मॅट लिपस्टिक ही पाण्यात भिजवलेल्या कपड्याने देखील पुसू शकतात.

हेही वाचा : तुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग ‘ही’ आहे योग्य पद्धत

लिप बाम वापरा: मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही लिप बाम वापरू शकता. यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडासा लिप बाम ओठांवर लावा. यासोबत, जेव्हा तुम्हाला लिपस्टिक काढावी लागते तेव्हा ती सहज काढली जाईल. याशिवाय ओठ कोरडे होणार नाहीत. 

मॅट लिपस्टिक जितक्या लॉंग लास्टिंग असतात तितकाच तिला काढताना त्रास होतो. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचवेळा मॅट लिप्सिट लावल्यानं ओठ कोरडे पडतात आणि त्यासोबतच ओठांना क्रॅक देखील जातात. त्याशिवाय तुम्ही कधी बुलेट लिपस्टिकही वापरू शकतात. त्यानं तुमचे ओठ ड्राय होणार नाहीत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Related posts