Wedding  News Destination Wedding Trend Goes Up Couples Spending Crores On Marriage At Malasiya Dubai Places

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Destination wedding : देशात लग्नसराईचा हंगाम (wedding Season) सुरु झाला आहे. यावर्षी देशभरात 38 लाख विवाह होणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या भावी जोडीदाराशी परदेशात किंवा सातासमुद्रापलीकडील एखाद्या सुंदर ठिकाणी लग्न करण्याचे स्वप्न पाहतो. जेणेकरून तो क्षण आयुष्यभर संस्मरणीय बनवू शकेल. सध्या लोकांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगची (Destination wedding) क्रेझही वाढत आहे. काही लोक त्यांच्याच शहरात लग्न करत आहेत, तर काही शहराबाहेर जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. या प्रकारच्या लग्नांना सामान्य लग्नापेक्षा जास्त खर्च येतो. यावेळी लोक डेस्टिनेशन वेडिंगच्या नावाखाली लग्नावर करोडो रुपये खर्च करत आहेत.

डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड इतका वाढू लागला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रेडिओवरील मन की बात कार्यक्रमात याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या काही कुटुंबांसाठी परदेशात जाऊन लग्न करण्यासाठी नवीन वातावरण तयार केले जात आहे. ते आवश्यक आहे का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. 

डेस्टिनेशन वेडिंग या लोकांची पसंती ठरली

विवाह उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांमध्ये घरापासून दूर सुंदर ठिकाणी लग्न करण्याचा ट्रेंड वाढत आहे. वेंडिंग प्लॅनर Vendingsutra.com चे सीईओ प्रदीप थियागराजन यांच्या मते, 10 टक्के उच्च नेट वर्थ व्यक्ती डेस्टिनेशन वेंडिंगला प्राधान्य देत आहेत. परदेशात लग्न करणारे फार कमी लोक आहेत. बहुतेक विवाह राजस्थान, गोवा, महाबलीपुरम, केरळ आणि मुंबई आणि दिल्लीच्या आजूबाजूला वेंडिंग हॉटस्पॉट मानल्या जाणार्‍या ठिकाणी होत आहेत. त्याचवेळी, केवळ 10 टक्के लोक आहेत जे परदेशात जाऊन लग्न करतात.

लग्नासाठी करोडो रुपये खर्च केले जातात

ऑनलाइन वेडिंग वेंडर डिरेक्टरीने 2021 आणि 2022 च्या अहवालात म्हटले आहे की, लग्नावरील खर्चात सरासरी 10 ते 15 लाख रुपयांची वाढ झाली आहे. यंदा सरासरी 18 लाखांच्या आसपास असणार आहे. अनम जुबेरच्या मते, यावर्षी देशातील टॉप डेस्टिनेशन डेहराडून, गोवा आणि जयपूर आहेत. डेस्टिनेशन वेंडिंगवर लोक 20 लाखांपासून करोडो रुपये खर्च करत आहेत. परदेशात लग्नसमारंभ झाला तर खर्च करोडोंमध्ये होतो.

लोकांना तात्पुरता रोजगार

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी परदेशात सुमारे 5000 विवाह होतात. ज्यावर सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. यावर्षी देशात 38 लाख लग्ने होतील असा अंदाज आहे ज्यामध्ये 4.7 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. अशा परिस्थितीत डेस्टिनेशन वेडिंग भारतातच होत असेल तर लग्नाचा खर्च भारतातच केला जाईल. याचा फायदा देशाच्या व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला होईल. लोकांना तात्पुरता रोजगार मिळेल.

ही आहेत हॉट वेडिंग डेस्टिनेशन 

परदेशात दुबई, मस्कत, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, माल्टा आणि मलेशिया येथे सर्वाधिक डेस्टिनेशन वेंडिंग होत आहे. भारतातील बहुतांश विवाह राजस्थान, गोवा, महाबलीपुरम, केरळ, शिर्डी, नाशिक, द्वारका, सुरत, बडोदा, नागपूर, ओरछा, ग्वाल्हेर, उदयपूर, जैसलमेर, पुष्कर, जयपूर आणि मुंबई येथे होत आहेत. दिल्ली, वाराणसी, मथुरा आणि वृंदावन ही देखील वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास आली आहेत.

या सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंगही केले होते

अलीकडेच विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांचा इटलीत विवाह झाला होता. तर कियारा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कतरिना कैफ – विकी कौशल यांनी घरापासून दूर लग्न केले. कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्राचे डेस्टिनेशन वेडिंग सवाई माधोपूरच्या बरवारा किल्ल्यावर तर कतरिना कैफ-विकी कौशलचे लग्न जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडले.

महत्त्वाच्या बातम्या:

सर्वात महागडे लग्न! 10, 20, 50 लाख नाहीतर, लग्नात खर्च केले तब्बल 500 कोटी 

[ad_2]

Related posts