[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 साठी (Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) दोन टप्प्यात मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. तुलनेनं छोटं मात्र महत्वाचं असं राज्य आहे छत्तीसगड. इथल्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पडलं. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.
काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शेवटच्या यादीत काँग्रेसनं ४ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. आतापर्यंत काँग्रेसनं एकूण २२ आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीत ७१ आमदार विजयी झाले होते. त्यापैकी २२ उमेदवारांचं तिकीट कापत काँग्रेसनं धाडसी पाऊल टाकलं आहे.
छत्तीसगड विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. यापूर्वी, 2018 मध्ये छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये जनतेने काँग्रेसला निवडून दिले आणि भूपेश बघेल यांनी सरकार स्थापन केले.
[ad_2]