Assembly Election Results 2023 Know About Which States Will Be Bjp Government And Congress Government

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Congress BJP :  आज चार राज्यातील निवडणुकांचे (Assembly Election Results 2023) निकाल जाहीर झाला आहे. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार आता काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजपने कमळ फुलवले आहे, तर तेलंगणात (Telangana) जनतेने काँग्रेसचा (Congress) हात धरला आहे. याशिवाय मिझोरामचे निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (4 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. 

या राज्यांमध्ये भाजपने सरकार बनवल्यास 12 राज्यांमध्ये ते स्वबळावर सत्तेत असणार आहेत. तर, काँग्रेस तीन राज्यांत स्वबळावर सत्तेत असणार आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश ही अशी राज्ये आहेत जिथे काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे आणि तेलंगणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. 

भाजप सरकार कोणत्या राज्यात सत्तेत?

केंद्रात सत्तेत असलेला भाजप उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेत आहे. भाजप मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. मात्र, हरियाणात भाजपची जननायक जनता पक्षाशी (जेजेपी) युती आहे. याशिवाय भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांतील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

या राज्यात काँग्रेसचे सरकार

कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आता स्वबळावर सत्तेवर असणार आहे. तेलंगणामध्ये, काँग्रेस आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी, सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) चा पराभव करून सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेस हा बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा देखील भाग आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, काँग्रेस सत्तेत सहभागी नाही. 

देशात राष्ट्रीय पातळीवरील किती पक्ष आहेत?

सध्या भारतात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (BSP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (CPM), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका पुढील वर्षी 2024 मध्ये होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

[ad_2]

Related posts