Indian Navy Day Narendra Modi To Inaugurate Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi New Logo Significance Celebrations History Quotes And Marathi Details abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: आपल्या देशात पहिला नेव्ही डे (Indian Navy Day) साजरा झाला तो 1944 साली. स्वातंत्र्यापूर्वी 21 ऑक्टोबरला नौसेना दिवस साजरा करण्याची पंरपरा होती. मग स्वातत्र्यानंतर डिसेंबर महिन्यात नौसेना दिन साजरा होऊ लागला. पण 1971 सालच्या पाकिस्तानविरोधातल्या युद्धात 4 डिसेंबरला भारतीय नौदलाने मिळवलेल्या अतुलनीय यशाचं प्रतिक म्हणून 1972 सालापासून दरवर्षी 4 डिसेंबरला नेव्ही डे साजरा केला जातो.

पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 साली आपल्या देशाच्या सीमेवर हल्ले करुन युद्ध छेडलं.पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाने 4 डिसेंबरला ऑपरेशन ट्रायडंट राबवलं. ऑपरेशन ट्रायडंटने पाकिस्तानच्या नौदलाचं कंबरडं मोडलं आणि पाकिस्तानला नामोहरम केलं. या युद्धात भारताला मिळवलेल्या यशाला सलाम आणि त्याचं स्मरण म्हणून 1972 सालापासून 4 डिसेंबरला नौसेना दिवस साजरा होऊ लागला.

पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं

1971 सालच्या नौदलाच्या ऑपरेशनच ट्रायडंटचा पहिला निशाणा होता कराचीतलं पाकिस्तान नौदलाचं मुख्यालय. भारतीय नौदलाच्या आक्रमक हल्ल्याने पाकिस्तान नौदलाची फक्त जहाजंच नाही तर अनेक ऑईल टँकर्सही उद्धस्त झाले. भारतीय नौदलाच्या आक्रमणाने कराची हार्बर फ्युएल स्टोरेज नष्ट झाल्याने पाकिस्तानच्या नौसेनेचं कंबरडं मोडलं आणि भारताने मोठा विजय मिळवला. 

कराची डेपोत लागलेली ही आग साधारणपणे सात दिवस धुमसत होती आणि त्यााची धग 60 किलोमीटच्या परिसरापर्यंत जाणवत होती. या युद्धात भारतीय लष्कर आणि वायुसेनेच्या साथीनं भारतीय नौदलानं पाकीस्तानला चारीमुंड्या चीत केलं आणि भारत 1971 सालचं युद्ध जिंकलं. सन 1971 च्या युद्धातला भारतीय नौसेनेचा पाकिस्तानवरचा विजय आणि नौदलाच्या शौर्य आणि सामर्थ्याचा अभिमान म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा होतो. 

यंदाचा नेव्ही डे भारतीय नौदलाचे जनक असा ज्यांचा अभिमानाने उल्लेख होतो त्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रम आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं पार पडतोय.

नेव्हीचा नवा लोगो शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेणारा

नौदलाचा आधीचा झेंडा आणि लोगो ब्रिटिशांच्या पाऊलखुणांची आठवण करुन देणारा होता. काळानुरुप त्यात बदलही होत गेले. पण गेल्या वर्षी भारतीय नौदलाने देशाच्या सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांपासून प्रेरीत होत आपल्या झेंड्यात आणि लोगोत गौरवास्पद बदल केले. नौदलाची शान असलेला नवा झेंडा आणि त्यावरचा नेव्हीचा लोगो छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेणारा आहे.

या नव्या लोगोत नेव्हीचं ब्रीदवाक्य आणि अँकर यांच्या भोवती असलेल्या अष्टकोनाची प्रेरणा शिवरायांच्या राजमुद्रेतून घेण्यात आली आहे. परकीय आक्रमणापासून आपल्या सागरी सीमा सुरक्षित करण्याच्या कामासाठी सागरी आरमाराची उभारणी करणारे आद्य संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख असल्याने शिवराय भारतीय नौदलासाठी सर्वात मोठे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. 

नौदलाच्या झेंड्यावरचा निळा अष्टकोनी आकार आठ दिशांचं प्रतिनिधीत्व करतो. आठही दिशांनाभारतीय नौदलाचा दबदबा कायम राहो ही भावना या अष्टटकोनी आकारातून प्रतित होते. या लोगोवर असलेलं अँकरचं चिन्हं स्थिरता दर्शवतं.

त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचा स्वाभिमान आणि अभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करुन आणि सिंधुदुर्गाच्या, राजकोट किल्ल्याच्या साक्षीनं पार पडणारा आजचा नौसेना दिनाचा सोहळा खरोखरचं ऐतिहासिक म्हणावा लागेल. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts