Death Of Anti Apartheid Revolutionaries Nelson Mandela Tamil Nadu Chief Minister Jayalalitha 5 December In History Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

5th December In History: नेल्सन मंडेला हे नाव कुणाला माहिती नाही असं होऊ शकणार नाही. त्यांनी केवळ दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधी लढ्याचे नेतृत्वच केलं नाही तर जगभरात शांती आणि बंधुतेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या मंडेला यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या जोरावर क्रांती घडवली. त्यांची आज पुण्यतिथी. तसेच सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता (J. Jayalalithaa) यांचीही आज पुण्यतिथी आहे.

1818: प्रसिद्ध गझलकार जोश मलिहाबादी यांची जयंती 

प्रसिद्ध गझलकार जोश मलिहाबादी यांचा आज जयंती आहे. ते ब्रिटिश काळातील प्रसिद्ध कवी होते. 1958 पर्यंत ते भारताचे नागरिक होते. मात्र नंतर ते पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाले. त्यांनी ‘जोश’ या टोपण नावाने अनेक गझल आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांचा जन्म मलिहाबाद, लखनौ येथे झाला. त्यामुळे ते जोश मलिहाबादी झाले. स्वातंत्र्यलढ्यात ते आपल्या लेखणीने सक्रिय होते. यातूनच ते त्या काळातील नेत्यांच्या विशेषतः जवाहरलाल नेहरूंच्या संपर्कात आले. 1947 मध्ये ब्रिटीश राजवट संपल्यानंतर ते ‘आज कल’चे संपादक झाले. 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला होता. 22 फेब्रुवारी 1982 रोजी त्यांचे निधन झाले.

1932: अभिनेत्री नादिरा यांचा जन्मदिवस

बॉलिवूड अभिनेत्री नादिरा यांचा (Nadira) आज जन्मदिवस आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. नादिरा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 9 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांचं निधन झालं.

1946 : भारतात होमगार्ड संघटनेची स्थापना 

चीनने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर 6 डिसेंबर 1962 रोजी होमगार्ड विभागाची स्थापना ( Home Guard of India) करण्यात आली.

2013: नेल्सन मंडेला यांची पुण्यतिथी  

आफ्रिकेचे ‘गांधी’ म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांची आज पुण्यतिथी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबरोबरच वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात शांततेचे दूत म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या नेल्सन मंडेला यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला, ज्या दरम्यान त्यांनी 27 वर्षे तुरुंगात घालवली. 

नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतात झाला. मंडेला 1944 मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले. लोकांमध्ये आपली छाप सोडणाऱ्या नेल्सन यांनी लवकरच आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची स्थापना केली आणि तीन वर्षांनंतर ते त्याचे सचिव बनले. काही वर्षांनी मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही निवड झाली. मंडेला आणि त्यांच्या मित्रांवर 1961 साली देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. पण त्यात त्यांना निर्दोष मानले गेले. 

यानंतर पुन्हा एकदा त्यांना 5 ऑगस्ट 1962 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी कामगारांना संपासाठी प्रवृत्त करणे आणि परवानगी न घेता देश सोडून जाणे यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याचवेळी 1964 ते 1990 या काळात वर्णभेदाविरोधात सुरू झालेल्या चळवळीमुळे त्यांना आयुष्यातील 27 वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्याच्या शिक्षेदरम्यान त्यांना रॉबेन बेटावर तुरुंगात ठेवण्यात आले होते.

2014: जागतिक मृदा दिन

5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.

2016 : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची पुण्यतिथी 

सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता (J. Jayalalithaa) यांची आज पुण्यतिथी आहे. 5 डिसेंबर  2016  रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांना अम्मा या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी झाला. राजकारणासोबतच जयललिता यांनी दक्षिणेतील चित्रपटांमध्येही आपली क्षमता सिद्ध केली होती.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts