( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kaal Bhairav Jayanti 2023 : आज कालभैरव जयंतीसह शनिचंद्र समसप्तक योग, प्रीति योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. हा योगायोग काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमची शत्रू आणि कायदेशीर अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत. कुठल्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या. (Kaal Bhairav Jayanti 2023 Samasaptak yoga of Shani and Moon rain of money will fall on these 5 zodiac signs)
मेष रास (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. तुमच्या कामाचं अधिकाऱ्यांकडून कौतुक होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
सिंह रास (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी चांगला काल भैरव जयंती भाग्यशाली ठरणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहे. वडिलांकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तुमच्या अनेक कामांमध्ये यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी काल भैरव जयंती लाभदायक असेल. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.
कन्या रास (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी काल भैरव जयंती भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. तुमची नियोजित कामं मार्गी लागणार आहे. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगल वातावरण असणार आहे.
धनु रास (Sagittarius Zodiac)
या राशींच्या लोकांना अनेक फायदे होणार आहेत. नवीन ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक लाभासह करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे. काल भैरवाच्या कृपेने शत्रूवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे.
कुंभ रास (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी काल भैरव जयंती शुभ ठरणार आहे. या लोकांचं नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नाव कमावण्याची संधीही मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या काल भैरव जयंती फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या कामात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या. घरात काही कौटुंबिक वाद असल्यास ते संपुष्टात येईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)