Cyclone Michaung Updates Ranchi Chennai Flight Canceled Due To Cyclone Michaung Many Trains Canceled By Indian Railway Know More Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyclone Michaung Updates: रांची : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) सोमवारी चेन्नई (Chennai) आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) पडत आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे चेन्नई विमानतळावरील (Chennai Airport) सर्व ऑपरेशन्स 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे हवाई सेवांव्यतिरिक्त, रेल्वे सेवा (Railway Services) रद्द किंवा उशीर झाल्या आहेत. ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या आगमनानं चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचलं आहे. यामुळे सोमवारी फ्लाईट क्रमांक 6E6113 आणि 209 चेन्नई-रांची-चेन्नई फ्लाइट रद्द करण्यात आलेली. दरम्यान, ही फ्लाईट संध्याकाळी 6.25 वाजता चेन्नईहून रांची येथे पोहोचते आणि रांचीहून चेन्नईला संध्याकाळी 6:55 वाजता पुन्हा रवाना होते. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, प्रवाशांना मोबाईल मेसेजद्वारे फ्लाईट रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, मिचॉन्ग चक्रीवादळामुळे रेल्वेनं अनेक गाड्या रद्दही केल्या आहेत. सर एम विश्वेश्वरय्या, बंगळुरू-हटिया एक्स्प्रेस (12836) 5 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्याही रद्द 

सर एम विश्वेश्वरय्या, बंगळुरू-हटिया वीकली एक्सप्रेस (18638) 5 डिसेंबरसाठी रद्द करण्यात आली आहे. हातिया-एर्नाकुलम धरती आबा एक्स्प्रेस (22837) सोमवारी रद्द करण्यात आली आहे. एर्नाकुलम-हटिया धरती आबा एक्सप्रेस ट्रेन (22838) 6 डिसेंबर रोजी रद्द राहील, कोईम्बतूर-बरौनी साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन (03358) 6 डिसेंबर रोजी रद्द राहील. धनबाद-अल्लापुझा एक्स्प्रेस (13351) सोमवारी रद्द करण्यात आली आहे. अल्लापुझा-धनबाद एक्स्प्रेस (13352) 6 आणि 7 डिसेंबरसाठी रद्द करण्यात आली आहे.

7 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस 

हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 आणि 7 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास सर्वच भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 8 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे किमान तापमानातही वाढ दिसून येईल, तर ढगांमुळे कमाल तापमानात घट होऊ शकते. 9 डिसेंबरपासून आकाश निरभ्र असेल. त्यानंतर किमान तापमानात घट अपेक्षित आहे. सोमवारी मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झारखंडच्या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांतील अनेक भागांत ढगाळ वातावरण होतं. राजधानीतही दिवसभर ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. राजधानीच्या अनेक भागांत तुरळक पाऊस झाल्याचंही पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Cyclone Michaung : आज आंध्र प्रदेशात धडकणार मिचॉन्ग, चक्रीवादळानं दक्षिण भारताला झोडपलं; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू

[ad_2]

Related posts