Government bans more than 100 websites that cheat people in the name of part-time jobs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Part Time Job Fraud: कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम फोमची सुविधा सुरु केली होती. कोरोनानंतरही आजच्या घडीला देखील ही वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सुरु ठेवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेकांनी वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम काम ऑनलाईन सर्च केले होते. दरम्यान या ट्रेंडवर फसवणूक करण्यांची मात्र नजर होती. आता याच लोकांना चाप बसवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. 

पार्ट टाईम जॉब आणि ऑनलाईन जॉब सर्च करण्याचा ट्रेंड फसवणूक करणाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सुरुवात केली होती. गेल्या काळात अशा पद्धतीच्या सायबर क्राईमच्या बातम्या देशभरातून येत होत्या. अशा बनावट कंपन्या तुम्हाला कामाच्या बदल्यात चांगल्या पैशांचे आमिष दाखवून फसवतात. त्यांच्या जाळ्यात अडकून अलीकडच्या काळात अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत.

अशातच आता सरकारने या बनावट वेबसाइट्सवर कडक कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने फसवणूक करणाऱ्या अशा 100 हून अधिक वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे या घोटाळेबाजांच्या कामाला आता चाप बसण्यास मदत होणार आहे. 

बाहेरच्या देशातून चालवल्या जात होत्या बेवसाईट्स

मिळालेल्या माहितीनुसार, या वेबसाइट्स भारत नाही तर भारताबाहेरून चालवल्या जात होत्या. इतकंच नाही तर या लोकांमार्फत अवैध गुंतवणूकही केली जात होती. ते चॅट मेसेंजर आणि डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत असत.

नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिट (NCTAU) च्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने गेल्या आठवड्यात या वेबसाइट्सची माहिती काढली होती. यानंतर केंद्र सरकारने त्यांना बंद करण्याची शिफारस पाठवली होती. माहितीनुसार, या वेबसाइट्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने नोकरी आणि गुंतवणूकीची ऑफर देऊन फसवत होत्या. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या.

क्रिप्टो करन्सी, एटीएम आणि फिनटेक कंपन्यांमधून पैसे काढण्यासाठी वापरले जाते

या गंडा घालणाऱ्या वेबसाइट्सच्या माध्यमातून लोकांना अडकवण्यासाठी परदेशात बसलेले लोक डिजिटल अॅड्स, चॅट मेसेंजर आणि भाड्याच्या अकाऊंट्सची मदत घेत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. हे लोक क्रिप्टो करन्सी, एटीएममधून परदेशात पैसे काढणं आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक केलेली रक्कम मिळवायचे.

Related posts