12 डिसेंबरला गायब होणार अतंराळातील ‘हा’ तारा; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आकाशात दिसणारा बेटेलगूस (Betelgeuse) हा सर्वात प्रसिद्ध तारा आहे. हा एक रेड सुपरजायंट आहे. म्हणजेच आता तो संपण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पण सर्वाधिक चमकणारा हा तारा 12 डिसेंबरला 12 सेकंदांसाठी गायब होणार आहे. यामागे उल्कापात कारणीभूत असणार आहे. 12 डिसेंबर 2023 ला ही अद्भितीय आणि दुर्मिळ घटना घडणार आहे. 

तुम्ही चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याबद्दल आधी ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. पण यावेळी एक उल्कापात या ताऱ्याला झाकणार आहे. 319 लियोना असं या उल्कापाताचं नाव आहे. म्हणजेच थोडक्यात बेटेलगूसचं ग्रहण असणार आहे. जवळपास 12 सेकंदासाठी हे ग्रहण होणार आहे. हा तारा ओरियन नक्षत्रात आहे. 

रात्री आकाशात सर्वाधिक चमकणाऱ्या पहिल्या 10 ताऱ्यांमध्ये बेटेलगूस शेवटच्या क्रमांकावर आहे. 11 आणि 12 तारखेच्या रात्री उल्कापात हा तारा आणि पृथ्वीच्या मधून जाणार आहे. यामुळे पृथ्वीवरुन 12 सेकंदासाठी हा तारा अजिबात दिसणार नाही. दरम्यान वैज्ञानिक याच संधीचा फायदा घेत बेटेलगूसचा अभ्यास करतील. 

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, रात्री आकाशात अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत. एखादी वस्तू चमकणाऱ्या ताऱ्याला कशी काय झाकू शकते हे आश्चर्यकारक आहे. पण जर तुम्हाला अवकाशातील हा दुर्मिळ क्षण अनुभवायचा असेल तर योग्य ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे. 

आशिया आणि दक्षिण युरोपमधून हा दुर्मिळ प्रकार पाहता येणार आहे. याशिवाय फ्लोरिडा आणि पूर्व मेक्सिकोमधूनही दिसणार आहे. इंटरनेशनल ऑक्यूलेशन टायमिंग असोसिएशनने याचं कव्हरेज करण्यासाठी एक विशेष पेज तयार केलं आहे. येथून तुम्हाला योग्य वेळ, स्थिती यांची माहिती मिळू शकते.

तुम्ही टेलिस्कोपच्या सहाय्यानेही पाहू शकता. याशिवाय, 11 डिसेंबर 2023 पासून तुम्ही इटलीच्या व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टद्वारे ते लाईव्ह पाहू शकता. हे दृश्य पहायचे असेल तर सूर्यास्तानंतर दोन तासांनी आकाशाच्या उजव्या बाजूला पाहिल्यास ओरियन बेल्टमध्ये आकाशात अल्निटक, अलनिलम आणि मिनाटक हे तारे उगवत असतात. Betelgeuse तारा त्याच्या डाव्या हाताला उजवीकडे उपस्थित असेल.

Related posts