( प्रगत भारत । pragatbharat.com)
Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे. घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात. साधारण महिन्यात 4 गुरुवार येतात. पण यंदा अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मार्गशीर्ष महिन्यात नेमकं 4 की 5 गुरुवार किती महालक्ष्मीचं व्रत करायचं आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं. (Margashirsha 2023 this year 4 or 5 Margashirsha Guruwar or Thursdays in the month of Margashirsh Since it is Amavasya when should Udayapana )
मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार?
पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6.24 वाजेपर्यंत अमावस्या आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिना 11 जानेवारीपर्यंत असणार आहे. 11 जानेवारीला गुरुवार आणि अमावस्या असल्याने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं त्याबद्दल जाणून घेऊयात.
यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार?
यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवारचं व्रत असणार आहे. अमावस्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आहे, असं पंडित सांगतात. 11 जानेवारीला अमावस्य असली तरी गुरुवारचं व्रत करुन उद्यापन करायचं आहे.
मार्गशीर्ष गुरुवार 2023 व्रताच्या तारखा
पहिला गुरुवार – 14 डिसेंबर
दुसरा गुरुवार – 21 डिसेंबर
तिसरा गुरुवार – 28 डिसेंबर
चौथा गुरुवार – 4 जानेवारी
पाचवा गुरुवार – 5 जानेवारी
अशी करा घटाची मांडणी
घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्य भागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे नक्की ठेवा.
असं करा महालक्ष्मीचं व्रत
मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घट बसवण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत. दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करुन हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो.
गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते. महिला दिवसभर उपवास करु संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन करण्यात येणार आहे. यादिवशी एखाद्या विवाहित महिलेचे खण साडीने ओटी भरावी. त्याशिवाय महिलांना हळदी कुंक, फुल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन केलं जातं.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)