( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amazon Wrong Product Delivery: अलिकडे ऑनसाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनेकजण घर बसल्याच ऑनलाईन वस्तू ऑर्डर करतात. मात्र, बऱ्याचदा ऑलाईन शॉपिंगच्या नादात अनेकांची फसवणुक होते. चुकीच्या वस्तू डिलीव्हर झाल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. एका व्यक्तीला मात्र, अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. या व्यक्तीने Amazon वरुन 20 हजार रुपयांचा हेडफोन खरेदी केला होता. प्रत्यक्षात पार्सल घरी आले तेव्हा बॉक्समध्ये हेडफोन नव्हता. बॉक्समध्ये हेडफोनच्या ऐवजी जी वस्तू दिसली ती पाहून ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला मोठा धक्का बसला. या प्रकाराचा व्हिडिओ संबधीत व्यक्तीने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Yash ojha नावाच्या व्यक्तीने आपल्या @Yashuish या एक्स हँडलवरुन ऑनलाईन शॉपिंगचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. 2 मिनीटे 20 सेकंदाच्या व्हिडिओ यश यांनी एक्स हँंडरवर अपलोड केला आहे. Amazon वरुन ऑर्डर केलेल्या हेड फोनचे अनबॉक्सिंग करतानाचा हा व्हिडिओ आहे. मात्र, व्हिडिओच्या शेवटी आपली फसवणुक झाल्याचे यश यांच्या लक्षात येते. यश यांनी एक्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ रिशेअर केला आहे. तर, अनेकांनी व्हिडिओ वर कमेंट देखील केल्या आहेत.
नेमका काय आहे प्रकार?
यश यांनी Amazon वरून 19,990 रुपयांचे Sony XB910N वायरलेस नॉईज कॅन्सलेशन हेडफोन खरेदी केला होता. घरी पार्सल आल्यावर त्यांनी बॉक्स उघडले मोठा धक्का बसला. कारण, बॉक्स अनबॉक्स केला तेव्हा त्यात हेडफोन नसून टूथपेस्ट मिळाली. हेडफोनच्या जागी टूथपेस्ट पाहून यश यांनी डोक्याला हात लावला. त्यांनी हेडफोनचे अनबॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ बनवला होता. तोच व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर करत Amazon ला टॅग करुन तक्रार दाखल केली आहे.
Well I ordered sony xb910n and got Colgate lmafao. pic.twitter.com/GpsiLWemwl
— Yash ojha (@Yashuish) December 8, 2023
Amazon चे उत्तर ऐकून संतापले
यश Amazon कडे याबाबत तक्रार केली. मात्र, Amazon ने आम्ही योग्य पार्सल दिल्याचे सांगत हात झटकले आहेत. Amazon India हेल्प डेस्कवर आणखी एक रिप्लाय दिला आहे. विक्रेता की डिलीव्हरी प्लॅटफॉर्म यामध्ये कोणाचा दोष आहे याची चौकशी केली. तो पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल असा रिप्लाय Amazon India हेल्प डेस्कने यश यांना दिला आहे.
या पूर्वी देखील अनेकदा घडले आहेत असे प्रकार
ऑनालाईन ऑपिंग करणाऱ्या अनेकांना यापूर्वी असे चित्र विचित्र अनुभव आले आहेत. कधी पार्सलमध्ये दगड सापडला तर कधी साबध. अनेकदा चुकीच्या वस्तू देखील डिलीव्हर झाल्या आहेत. एका व्यक्तीने 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही विकत घेतला होता, मात्र बॉक्समधून दुसऱ्या ब्रँडचा टीव्ही मिळा होता.