( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Old Sisters Birthday Video: आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला काही वयाचे बंधन नसते. त्यातून आपला वाढदिवस साजरा करायलाही मग का असावं. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत आपल्या वयाचे कोणतेही बंधन न मानता चक्क आपल्या मोठ्या वयस्कर बहीणचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावरती जोरात चर्चा आहे. नेटकऱ्यांनीही यावेळी या व्हिडीओखाली नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाला कुठल्याच गोष्टीचे बंधन नसते हे या व्हिडीओनं परत एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे अतिप्रचंड वेगानं हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भावांप्रमाणे बहिणींच्या प्रेमाबद्दल अनेकांना कुतूहल असते. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओतूनही आपल्याला बहिणींच्या प्रेमाचे दर्शन घडते. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की दोन वयस्कर बहिणी या आपल्या मोठ्या बहिणीचा 94 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. यावेळी त्या दोघी मस्तपैंकी डान्सही करताना दिसत आहेत. त्यांचा हा मनसोक्त डान्स पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. अर्थात, त्यांना काही विशीतल्या तरूणीसारखा डान्स करता आला आहे असं नाही परंतु त्यांनी केलेली ही मजा पाहून त्यांच्या धैर्याला सलाम करावं तितकंच कमी आहे. वयात आला आहोत, आपल्या वयाप्रमाणे वागा असं अनेकदा अनेकांना सांगितलं जातं. परंतु आपल्या वयापेक्षा आपल्या आणि आपल्या बहिणीच्या आनंदाला प्राधान्य देणाऱ्या या तीनही आज्जीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल.
हेही वाचा : Animal: ‘सगळे वेडे झालेत…’ बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
@goodnews_movement या इन्स्टाग्राम युझरनं यावेळी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे त्याची बरीच जोरात चर्चा आहे. यावेळी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘फक्त आनंद. या तीन बहिणी, आपल्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करत आहेत. सोबतच डान्सही करत आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा, यंग लेडी’
यावेळी या तीनही बहीणींनी एकत्र डान्स केला. डान्स करताना त्या दोघी प्रचंड आनंदी होत्या. त्यांचा हा आनंद पाहून नेटकऱ्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका दिवसातच चक्क या व्हिडीओला 2.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. यावेळी नेटकरीही सुसाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, ‘या दोघींचा आनंद असाच राहिला पाहिजे’. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलंय की, ‘सुंदर व्हिडीओ’. तर अशाच एका युझरनं लिहिलंय की ‘व्वा, प्रेम असावं तर असं.’