Ram Temple Ayodhya Invitation Letters Process Began Ram Temple Inauguration Ceremony

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Invitation letters for Ram Temple Inauguration : रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. 22 जानेवारी2024 ला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत.  त्यासाठी तयारी सुरू झाली असून देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. मात्र याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे. या निमंत्रणपत्रात नेमकं काय आहे आणि ते कसं आहे? पाहुयात…

निमंत्रणपत्रात नेमकं काय आहे

अयोध्येत रामलालच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी त्यांना निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रण पत्र 

अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रण पत्रही पाठवण्यात आले आहे. हे पत्र 7000 लोकांना पाठवण्यात आले असून, हजारो भाविक येण्याची शक्यता आहे.  भारतीय क्रिकेट देवाचा दर्जा मिळवलेल्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही रामलल्ला प्राण प्रतिष्ठानसाठी निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. त्यासोबतच विराट कोहलीलाही निमंत्रण पत्र पाठवण्यात आलं आहे. 

23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन सुरु होणार

अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मकर संक्रांतीनंतर 22 जानेवारीला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. 20 आणि 21 जानेवारीला कोणत्याही भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी फक्त  प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित झालेल्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. या काही दिवसांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतातून रामलल्लाचे भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाची बातमी-

इंटरव्यू, ट्रेनिंग अन् फायनल एग्जाम; अयोध्येत रामललाच्या सेवेसाठी पुजाऱ्यांची नियुक्ती, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया

 

 

 

 

[ad_2]

Related posts