Coronavirus In India Kerala Reported 111 Corona Infected In Single Day Central Health Ministry Advisory

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Coronavirus In India :  केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची (Corona Cases) संख्या वाढू लागली आहे. सोमवारी, 18 डिसेंबर रोजी 111 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये 1634 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय, एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 72 हजार 53 इतकी झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 

केंद्राने इशारा दिला

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे, आम्ही (COVID-19) प्रकरणांची संख्या कमी करू शकलो. मात्र, कोविड-19 चा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

केरळ आणि तामिळनाडूचा केला उल्लेख 

पंत म्हणाले की अलीकडे केरळसारख्या काही राज्यांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. भारतात कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते.  इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हा-आधारित प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणे लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांबाबत नियमितपणे अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.

राज्यांना काय सल्ला दिला?

केंद्र सरकारने सर्व  राज्यांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चाचणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुरेशी चाचणी सुनिश्चित करण्यासाठी आणि RT-PCR आणि अॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या पत्रात पंत यांनी आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी संक्रमित आढळलेले नमुने भारतीय SARS CoV-2 Genomics Consortium (INSACOG) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याच्या गरजेवरही भर दिला, जेणेकरून नवीन व्हेरिएंटचा शोध लवकर लावला जाईल. 

[ad_2]

Related posts