Ram Mandir Inauguration Shri Ram Mandir Paduka Made From One Kg Gold And Seven Kg Silver

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Inauguration:  तब्बल 1 किलो सोनं आणि 7 किलो चांदीचा वापर करत श्रीरामाच्या (Ram Mandir) पादुका तयार करण्यात आल्या आहेत. या पादुका सध्या एसजी हायवेवरील तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला  राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्याआधी 19 तारखेलाच या पादुका अयोध्येत (Ayodhya)  दाखल होतील. हैदराबादमधील श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका तयार केल्या आहेत. तर सोन्या चांदी व्यतिरीक्त या पादुका तयार करताना बहुमुल्य रत्नांचा त्यात वापर करण्यात आला आहे. रविवारी पादुका रामेश्वरधामहून अहमदाबादला आणण्यात आल्या होत्या.

अयोध्येला 22 जानेवारी राम मंदिराचे उद्घाटन होणा आहे.त्याअगोदर 19 जानेवारीला या पादुका अयोध्येला पोहचणार आहे.या पादुका हातात घेऊन श्री चल्ला श्रीनिवास अयोध्या निर्माणधीन मंदिराची 41 दिवसाची परिक्रमा देखील पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी 2500 पाहुण्यांची लिस्ट तयार केली आहे. त्याशिवाय 4000 साधुसंतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. 23 जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे. 

दिग्गजांना निमंत्रण

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अदाणी यांचा समावेश आहे. 

23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन सुरु होणार

अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मकर संक्रांतीनंतर 22 जानेवारीला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. 20 आणि 21 जानेवारीला कोणत्याही भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी फक्त  प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित झालेल्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. या काही दिवसांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतातून रामलल्लाचे भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे. हे. 

[ad_2]

Related posts