Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 2024 : प्रत्येकाला नवीन वर्षांची उत्सुकता लागली आहे. नवीन वर्षाचं (New Year 2024) स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही बेत आखला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे चार राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.  2024 मधील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहता 4 राशींच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष लकी असणार आहे. (Horoscope 2024 Will 2024 be lucky for 4 zodiac signs Fortune will shine like the sun success with money)

कर्क राशीभविष्य 2024 (Cancer 2024 Yearly Horoscope)

या राशीच्या लोकांची नवीन वर्षात आर्थिक अडचण दूर होणार आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर त्याबद्दल काही अडचणी येऊ शकतात. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. मे 2024 च्या सुरुवातीला करिअरमध्ये यशाच शिखर गाठणार आहात. पदोन्नतीचीही शक्यता बळकट आहे. कार्यालयातही तुमचं योगदान आणि कामाचे कौतुक होणार आहे. कुटुंबासोबत सहलीलाही जाण्याचे बेत आखणार आहात. ऑक्टोबर 2024 मध्ये घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. नवीन पाहुण्याच्या आगमनाची बातमी कानावर पडणार आहे. नवीन वर्ष तुमच्या 70 टक्के इच्छा पूर्ण होतील असं ज्योतिषशास्त्र सांगतात. 

कन्या राशीभविष्य 2024 (Virgo 2024 Yearly Horoscope)

या राशीच्या लोकांसाठीकरिअरच्या दृष्टीने 2024 हे वर्ष खास सिद्ध होणार आहे. तुम्हाला जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत कामात संथ गती जाणवले पण मार्च 2024 नंतर परिस्थिती झपाट्याने बदलणार आहे. नोकरी करणाऱ्यांना फायदा मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती या वर्षी तुम्हाला मिळणार आहे. नवीन कार किंवा नवीन घराचं स्वप्नही पूर्ण होताना दिसणार आहे. जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 हा महिना आनंदाचा ठरणार आहे. एकंदरीत 2024 हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी 80-85 टक्के लकी ठरणार आहे. 

धनु राशीभविष्य 2024 (Sagittarius 2024 Yearly Horoscope)

 2024 हे धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. जानेवारी 2024 ते मार्च 2024 हा काळ तुमच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरणार आहे. आबँकिंग आणि शेअर बाजाराशी संबंधित लोकांना लाभच लाभ होणार आहे. एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही तुमचं नुकसान आणि लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी 85 टक्के वरदान ठरणार आहे. 

मकर राशीभविष्य 2024 (Capricorn 2024 Yearly Horoscope)

शनीची रास मकर असल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असणार आहे. 2024 मध्ये शनि तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग घेऊन आला आहे. जानेवारी 2024 च्या शेवटी, शनि तुम्हाला आर्थिक लाभ देमार आहे. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळणार आहे. ऑफिसमध्येही तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहे. पासपोर्ट आणि व्हिसाशी संबंधित काम ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. ऑक्टोबर 2024 आणि नोव्हेंबर 2024 हा काळ खेळाडूंसाठी चांगला ठरणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी 70-75 टक्के उत्तम असणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts