Helmet Man Of India Man Who Distribute Helmets For Free Meet Helmet Man Raghvendra Kumar India S Helmet Man Gives Away Headgear To Save Lives

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Helmet Man of India : सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) एका हेल्मेट मॅनला पाहिलं असेल. या हेल्मेट मॅनचे (Helmet Man) अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असतात. डोक्यावर हेल्मेट घालून हा व्यक्ती रस्त्यात उभी राहून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या लोकांना थांबवून फुकटात वाटतो. देशभरातील अनेक शहरांमध्ये तुम्ही हेल्मेट घातलेल्या व्यक्तीला सोशल मीडियावर हेल्मेट वाटताना पाहिलं असेल. 

हेल्मेट मॅन ऑफ इंडिया

भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून यांच खरं  नाव राघवेंद्र कुमार आहे. ते हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या थांबवतात आणि त्यांना हेल्मेट घालायला लावतात. दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटबाबत जागरुकतता पसरवत त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला. यासाठी त्यांनी नोकरी सोडली, घर-दार विकलं आणि दुचारीस्वारांचे प्राण वाचवण्यासाठी मोफत हेल्मेट वाटण्याचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमामागची कहाणी काळजाला भिडणारी आहे.

कोण आहे ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’?

राघवेंद्र कुमार यांचा मित्र कृष्ण कुमारचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्यांनी रस्ता सुरक्षेसाठी मोहीम राबवण्यासाठी आपलं घरही विकलं. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी देशातील 22 राज्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत लोकांना जागरुक केले आहे आणि एवढ्यावरच हे थांबणार नसून संपूर्ण देशभरात ही मोहिम पोहोचवणार आहेत.

रस्ते जागरुकता मोहिमेची सुरुवात कशी झाली?

‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ उर्फ राघवेंद्र कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 2014 मध्ये नोएडामधील त्यांचा एक जवळचा मित्र हेल्मेटशिवाय रस्त्यावर दुचाकी चालवत असताना, त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या मित्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राघवेंद्र यांनी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचं ठरवलं, ज्यामुळे त्यांच्या मित्राप्रमाणे रस्ता अपघातात इतर कोणाचा मृत्यू होऊ नये. इतकंच नाही तर, या मोहिमेला त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं आहे. आता ते जगभरात ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

22 राज्यांमध्ये 60 हजार हेल्मेट वाटप

राघवेंद्र यांनी सांगितलं की, भारतातील रस्ते अपघातात दररोज शेकडो जीव गमावले जात आहेत, त्यामुळे लोकांना वाहतूक नियमांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी देशभरातील 22 राज्यांमध्ये ही मोहीम चालवली आहे. आतापर्यंत त्यांनी 60 हजारांहून अधिक हेल्मेटचे वाटप केले असून 35 जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं आहे. 

नोकरी सोडली, घर आणि जमीनही विकलं

रस्ते जागरुकता मोहिम राबवण्यासाठी राघवेंद्र यांनी आधी नोकरी सोडली, नंतर नोएडामधील घर विकलं आणि देशभरात रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवायला सुरुवात केली. राघवेंद्र यांनी या मोहिमेसाठी बिहारमधील आपली वडिलोपार्जित सात एक जमीनही विकली आहे. या पैशातून त्यांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या लोकांना मोफत हेल्मेट वाटप करत आहेत.

[ad_2]

Related posts