Personal Finance Income News India Largest Survey Of Common People Income Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Personal finance : सर्वसामान्यांच्या कमाईशी संबंधित देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण समोर आलं आहे. सर्वसामान्य भारतीय कमाईसाठी आणि आयुष्य सुधारण्यासाठी नवे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.  यामध्ये सामान्य जीवनाशी निगडीत अनेक घटना समोर आल्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच 10 प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत. जी तुमच्या आयुष्याशी संबधीत आहेत.

भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न किती?

2022 मध्ये भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न हे 23 000 रुपये होते, ते आता म्हणजे 2023 मध्ये 25,910 रुपये झाले आहे.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कमाई करणारे कुटुंबे आहेत?

2022 मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर कर्नाटक आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. कर्नाटक 2023 मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या राज्यातील सरासरी कमाई ही 35,411 रुपये आहे.

भारतात सर्वात कमी कमाई करणारे कुटुंब कोणत्या राज्यात आहेत? 

2022 वर्षी  भारतात सर्वात कमी कमाई करणाऱ्या कुटुंबामध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर होते. या वर्षीही 2023 मध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील किती टक्के कुटुंबे घर चालवण्या इतपतही कमाई करत नाहीत? 

देशातील 7 टक्के लोक असे आहेत की ज्यांची घर चालवण्याइतपतही कमाई नाही.

भारतातील किती कुटुंबे बचत करताता? 

2022 मध्ये भारतात बचत करणाऱ्या कुटुंबांची संख्या ही 70 टक्के होती. जी आता 88 टक्के झाली आहे.

भारतीय कुटुंब सर्वात जास्त बचत कुठे करतात? 

भारतातील 70 टक्के लोकांनी आपली बचत बँकेत ठेवली आहे.

गेल्या पाच वर्षांत किती कुटुंबांनी आपली बचत मोडली? 

गेल्या पाच वर्षांत भारतातील 67 टक्के लोकांनी आपली बचत मोडली आहे.

67 टक्के कुटुंबांनी आपली बचत मोडण्याचे मुख्य कारण म्हणजे उपचारासाठी पैशांची कमतरता.

विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या असलेलं शहर कोणतं? 

मदुराई हे एक असं शहर आहे की जिथं 84 टक्के लोक विमा पॉलिसी खरेदी करतात.

कोणत्या शहरातील किती कुटुंबांकडे सर्वाधिक सोने आहे?

2022 मध्ये सुरतचे लोक सोने बाळगण्यात नंबर-1 होते. आता बंगळुरुचे लोक सर्वाधिक सोने ठेवतात.

कोणत्या राज्यातील कुटुंबे सर्वात जास्त गुंतवणूक करतात? 

हरियाणातील लोकांना सर्वाधिक गुंतवणूक करायला आवडते.

भारतीय कुठे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात? 

गुंतवणुकीसाठी मालमत्ता हा पहिला पर्याय आहे. ज्यामध्ये 17 टक्के भारतीय त्यांचे पैसे गुंतवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मोदी सरकारच्या तिजोरीत मोठी भर, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली ‘एवढी’ वाढ

 

[ad_2]

Related posts