Bank Holiday News In 2024 Check Full List Of Banks Closed Next Year Business Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bank Holiday News : 2023 या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. काही दिवसातच नवीन वर्ष 2024 ला  सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरु झाल्यावर रविवार आणि शनिवार वगळता इतर अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत.  रिझर्व्ह बँकेने (RBI) पुढील वर्षीच्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पुढील वर्षी बँका 50 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास बँकेच्या सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. 

नवीन वर्ष सुरु होण्यास अगदी काहीच दिवस उरले आहेत. या नवीन वर्ष 2024 मध्ये 50 दिवस बँका राहणार बंद राहणार आहेत. याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.    

1 जानेवारी 2024 – देशभरातील बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2024- मिझोराममध्ये मिशनरी डेमुळे बँका बंद आहेत.
12 जानेवारी 2024- पश्चिम बंगालमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2024- दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2024- मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशातील अनेक राज्यांमधील बँकांना सुट्टी असेल.
15 जानेवारी 2024- तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँका बंद राहतील.
16 जानेवारी 2024- तुसू पुजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2024- गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
23 जानेवारी 2024- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2024- हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2024 – प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.
31 जानेवारी 2024 – मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी असेल.
15 फेब्रुवारी 2024- मणिपूरमध्ये Lui-Ngai-Ni मुळे बँका बंद राहतील.
19 फेब्रुवारी 2024- महाराष्ट्रातील बँकांना शिवाजी जयंतीनिमित्त सुट्टी असेल.
8 मार्च 2024- महाशिवरात्रीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 मार्च 2024- होळीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
29 मार्च 2024- गुड फ्रायडे मुळे देशभरात बँका बंद राहतील.
9 एप्रिल 2024- कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात उगादी/गुढीपाडव्याला बँका बंद राहणार आहेत.
10 एप्रिल 2024- ईद-उल-फित्रमुळे बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024- रामनवमीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
1 मे 2024- अनेक राज्यांमध्ये कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असेल.
10 जून 2024-श्री गुरु अर्जुन देवजी शहीद दिनानिमित्त पंजाबमध्ये बँक असेल.
15 जून 2024- मिझोरममध्ये YMA दिनानिमित्त बँका बंद राहतील.
6 जुलै 2024- MHIP दिनानिमित्त मिझोरममध्ये बँका बंद राहतील.
17 जुलै 2024- मोहरमनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
31 जुलै 2024 – शहीद उधम सिंग यांच्या शहीद दिनानिमित्त हरियाणा आणि पंजाबमधील बँकांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2024 – स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.
19 ऑगस्ट 2024 – रक्षाबंधनामुळे बँका बंद राहतील.
26 ऑगस्ट 2024- जन्माष्टमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
7 सप्टेंबर 2024- गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
13 सप्टेंबर 2024-रामदेव जयंती, तेजा दशमी, राजस्थानमध्ये बँका बंद राहतील.
16 सप्टेंबर 2024- ईद-ए-मिलादनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
17 सप्टेंबर 2024- सिक्कीममध्ये इंद्र जत्रेमुळे बँका बंद राहतील.
18 सप्टेंबर 2024- नारायण गुरु जयंतीनिमित्त केरळमध्ये सुट्टी असेल.
21 सप्टेंबर 2024- नारायण गुरु समाधीनिमित्त केरळमध्ये सुट्टी असेल.
23 सप्टेंबर 2024- हरियाणामध्ये शूरवीरांच्या शहीद दिनानिमित्त बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंतीनिमित्त देशभरात बँका असतील.
10 ऑक्टोबर 2024- महासप्तमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
11 ऑक्टोबर 2024 – महाअष्टमीमुळे बँका बंद राहतील.
12 ऑक्टोबर 2024- दसऱ्यानिमित्त बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2024 – सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त गुजरातमध्ये बँका बंद राहतील.
1 नोव्हेंबर 2024- कुट, हरियाणा दिवस, कर्नाटक राज्योत्सवाला अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
2 नोव्हेंबर 2024- निंगोल चकौबा मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
7 नोव्हेंबर 2024- बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजेमुळे बँका बंद राहतील.
15 नोव्हेंबर 2024- गुरु नानक जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
18 नोव्हेंबर 2024- कर्नाटकात कनक दास जयंतीला सुट्टी असेल.
25 डिसेंबर 2024- नाताळनिमित्त सुट्टी असेल.

याप्रमाणे 50 दिवस देशातील बँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळं ज्या नागरिकांना बँकेच्या संदर्भातील कामे करायची आहेत, त्यांनी ही यादी तपासूनच घराबाहेर पडावे. ग्राहकांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्यांच्या सण आणि वर्धापन दिनानुसार सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करायचे असेल तर ही यादी पाहून तुम्ही ते करू शकता. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

सगल 5 दिवस बँका राहणार बंद, बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ‘ही’ यादी तपासा

[ad_2]

Related posts