Post Office Savings Scheme Indians Crazy To Invest In Post Office Savings Scheme Survey Change Your Perspective Towards Investment

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Post office savings scheme : सातत्यानं महागाई वाढत आहे. या महागाईच्या चिंतेत बचतीचे महत्त्व अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या (Post office) योजनांमध्ये पैसा गुंतवण्याबाबत (investment) लोकांचा विश्वास वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बचत करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. 2022 मध्ये 70 टक्के कुटुंबे बचत करत होती.  तर 2023 मध्ये हा आकडा 88 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

कुटुंबातील बचत वाढण्याचे मुख्य कारण कोरोना हे देखील आहे. कारण त्याचा परिणाम लोकांच्या कमाईवर झाला आहे. कोविडनंतर, लोकांना समजले की, त्यांच्याकडे भविष्यासाठी कोणतीही बचत नाही. अशा परिस्थितीत लोक बचतीसाठी पैसे कुठे गुंतवतात हा एक प्रश्न आहे.

पैशांची बचत करण्यावर लोकांचा भर

बचत करणाऱ्या कुटुंबांच्या संख्येत तसेच भारतीय लोकांच्या बचत पद्धतींमध्येही बदल झाला आहे. अलीकडील आकडेवारीवरुन असे सिद्ध झाले आहे की, बँकेत ठेवी ठेवणाऱ्या लोकांची संख्या 2022 पर्यंत 64 टक्केच्या तुलनेत 77 टक्के झाली आहे. बँकांमधील बचत वाढण्याचे एक कारण म्हणजे ठेवींवरील व्याज जास्त आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेचाही निर्णय असू शकतो. ज्यामध्ये बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळं लोकांनी आपल्या घरात ठेवलेल्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या आहेत.

विमा खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की लोक आता अधिक विमा खरेदी करत आहेत. कोरोनानंतर हा बदल दिसून आला आहे. गेल्या वर्षी, 19 टक्के कुटुंबांनी विमा खरेदी केला होता. तर 2023 च्या सर्वेक्षणात हा आकडा 27 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं विम्याची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचे दिसत आहे.

पोस्ट ऑफिस बचतीचा नवीन ट्रेंड 

बचतीमध्ये एक नवीन ट्रेंड दिसत आहे. पोस्ट ऑफिसच्या विविध लहान बचत योजनांमध्ये पैसे जमा करणाऱ्या कुटुंबांच्या संख्येत वाढ झाली आहे. जी 2022 मध्ये 21 टक्क्यांवरुन 2023 मध्ये 31 टक्के झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लहान बचत योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवल्या जातात, ज्यामध्ये चांगले व्याजही मिळते. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांची संख्याही 15 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

‘या’ योजनेत दररोज 100 रुपये जमा करा, 5 वर्षांत ‘एवढे’ लाख रुपये मिळावा

 

[ad_2]

Related posts