Ayodhya Ram Mandir Contruction Detail Information How Is Ram Temple Inauguration Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. या मंदिराचे दरवाजे आणि महाराष्ट्राचं खास नातं आहे. या मंदिरात बारा दरवाजे असतील, महाद्वार आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत. सर्व दरवाजांच्या निर्मितीसाठी देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची गरज होती. यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला गेला. त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर परिसरातलं सागवानी लाकूड सर्वोच्च क्वालिटीचं आहे असा अहवाल दिला. मग या सागवानी काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंते आणि एल अँड टी कडून चाचणी पूर्ण झाली आणि या काष्टाची निवड झाली.

भलामोठा परकोटा 

राम जन्मभूमी मंदिराचा सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधला जाणारा परकोटा. तामिळनाडू आणि केरळच्या मंदिरात परकोटा बांधण्याची परंपरा आहे राजस्थानच्या वृंदावन मंदिरासमोरही हा परकोटा पाहायला मिळतो. राम मंदिराचा परकोटा 732 मीटर लांब असेल आणि 14 फूट रुंद असेल. हा परकोटा दुमजली असेल ज्याचा खालचा भाग ऑफिशियल कामांसाठी वापरला जाईल.

जो परकोट्याचा वरचा भाग आहे तो भक्तांसाठी परिक्रमा मार्ग असेल. या परकोट्याच्या चार भुजांवर सहा मंदिर असतील. एका कोन्यावर सूर्य भगवानाचं मंदिर असेल. राम सूर्यवंशी आहेत त्यामुळे सूर्य भगवानाच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. 

दुसऱ्या कोन्यावर शंकराचं मंदिर, तिसऱ्या कोन्यावर भगवती देवीचं,  चौथ्या गणपतीचं, पाचव्या कोन्यावर हनुमानाचं तर सहाव्या कोन्यावर माता अन्नपूर्णेचा मंदिर असेल. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राच्या मालकीचा आता 70 एकरांचा परिसर आहे. ज्याच्या उत्तरेकडे मंदिर बांधले जात आहे.

या पद्धतीच्या रचनेला पंचायतन असं म्हणतात. 2000 वर्षांपूर्वी शंकराचाऱ्यांनी ही संकल्पना दिली होती. त्यामुळे संपूर्ण भारत आणि संपूर्ण शक्तीच एकत्रीकरण इथे झालेलं पाहायला मिळेल. 

रामाच्या मंदिराची काही विशेष माहिती 

उत्तर भारतात गेल्या दोनशे ते चारशे वर्षात मंदिराची अशी रचना झालेली नाही. जमिनीखाली फाउंडेशनसाठी परिस्थिती योग्य नसल्याचं परीक्षणादरम्यान लक्षात आलं. मंदिराच्या पश्चिमेकडून शरयू नदी वाहत असल्याने मंदिराच्या तळाशी खाली फाउंडेशनच्यावेळी वाळू आणि भुरभुरrत माती आढळून आली. मग दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, चेन्नई इथल्या आयआयटीनं नॅशनल जिओग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, एल अँड टी आणि टाटाच्या इंजिनियर्सनी प्रचंड मेहनत घेतली आणि एक मोठा खड्डा खणून जवळपास दोन लाख घनमीटर माती हटवली गेली. मग स्टोन डस्टचा वापर करून आणि अतिशय अल्प प्रमाणात सिमेंट वापरून नव्याने फाउंडेशन तयार केलं गेलं.

मंदिराच्या दगडांपर्यंत पाणी पोहोचू नये यासाठी 17,000 ग्रॅनाईट ब्लॉकचा वापर केला गेला आहे आणि जमिनीपासून 21 फूट उंचीपर्यंत हे ग्रॅनाईट लावलं गेलेलं आहे. फाउंडेशनच काम पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा वेळ लागला आणि त्यानंतर मी 2022 पासून मंदिर निर्माणच मुख्य काम सुरू झालं. मंदिरात वापरला गेलेला दगड हा राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पहाडपूर मधून आणला गेलेला आहे. पिंक स्टोन असं त्याचं नाव आहे, ज्यावर कलाकुसरीचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करता येतं.

राम मंदिराचं व्यवस्थापन चोख

मंदिराच्या पश्चिमेला एक लिफ्ट आहे ज्या लिफ्टचा वापर वृद्ध दिव्यांग करू शकतात तर पूर्व दिशेला व्हील चेअर साठी दोन रॅम असतील. 

जवळपास 25000 भाविकांचे सामान ठेवण्याची व्यवस्था सुद्धा मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. लॉकर सेवेच्याच बाजूला एक चिकित्सालय आणि हॉस्पिटल असेल. याच परिसरामध्ये भाविकांना आपल्या चपला काढून ठेवाव्या लागतील. मंदिर परिसरामध्ये बाथरूम आणि वॉशरूम याची विशेष सोय असेल. यासाठी एका कॉम्प्लेक्सची निर्मिती केली जाते आहे. जात 500 शौचालय आणि स्नानगृह असतील.

या परिसरात आणखी सात मंदिरांचा निर्माण केला जाणार आहे. महर्षी वाल्मिकी, विश्वामित्र निषादराज, वशिष्ठ, अगस्त्य, शबरी आणि अहिल्येचं मंदिर असेल. मंदिर परिसरामध्ये जटायूची एक मूर्ती सुद्धा उभारली जाणार आहे. एकशे पंचवीस पूजा परंपरेनं 22 जानेवारीला राम लल्लाचं स्वागत केलं जाणार आहे. यानंतर 23 जानेवारीपासून पुढे 48 दिवस मंडल पूजा केली जाईल. 

ही बातमी वाचा: 

Ayodhya Ram Lalla Devotee Emotional : अयोध्येतील रामभक्त भावूक, ज्ञानदा कदमचेही डोळे पाणावले

[ad_2]

Related posts