Congress Maha Rally Hai Taiyaar Hum In Nagpur Where Congress Demand For Financial Supports QR Code On Chair Rahul Gandhi Nagpur Visit Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : काँग्रेस (Congress) पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात (Nagpur News) काँग्रेसची “हैं तैयार हम”  (Hain Taiyar Hum) महारॅली होणार आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग फुंकणार आहे. विशेष बाब म्हणजे  ‘है तयार हम’ या महारॅली सभेच्या निमित्ताने दीक्षाभूमी आणि संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे. या सभास्थळी भव्य असे तीन स्टेज उभारण्यात आले आहेत. स्टेजवर 620 खुर्च्या ठेवण्यात आल्यात. यासोबतच सभास्थळी मोठ्या प्रमाणात आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील प्रत्येक खुर्च्यांवर क्युआर कोड लावण्यात आले आहे. या महारॅलीच्या निमित्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पक्षनिधीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचं बघायला मिळत आहे.

सभास्थळी खुर्च्यां क्युआर कोड

यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने पार्टी क्राऊड फंडिग राबवत ‘डोनेट फॉर देश’ ही मोहीम हाती घेतली होती. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी काँग्रेसने 18 डिसेंबरला डोनेट फॉर देश मोहीम सुरू केली. आज 28 डिसेंबरला काँग्रेस आपला 138 वा स्थापना दिवस नागपुरात साजरा करत आहे. या निमित्ताने 138 रुपये, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा या रकमेच्या 10 पट रक्कम 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकडून जमा करण्याचे आवाहन काँग्रेसने केले होते. या मोहिमेत स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या अभियानाचा शुभारंभ करताना 1 लाख 38 हजार रुपयांची देणगी दिली. आज त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात हे क्युआर कोड लावण्यात आले आहेत.

काँग्रेस कार्यकर्ते  घरोघरी जाऊन जमा करणार किमान 138 रुपये

आतापर्यंत ही मोहीम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती. मात्र, आज काँग्रेसच्या स्थापना दिनानंतर काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना किमान 138 रुपये देणगी देण्याची मागणी करणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या मोहिमेविषयी बोलताना म्हणाले होते की, पक्ष पहिल्यांदाच देशासाठी देणगी मागत आहे. जर आपण श्रीमंत लोकांवर अवलंबून राहिलो तर, आपल्याला त्यांची धोरणे स्वीकारावी लागतील. महात्मा गांधींनीही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांकडून देणग्या घेतल्या.

नागपुरातून निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचं कारण काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ही रॅली नागपुरातच आयोजित करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या विचारधारेचा संदेश नागपुरातून द्यायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालयही नागपुरात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे काँग्रेसचे लक्ष आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात मोठ्या सभेने निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या रॅलीला ‘है तैयार हम’ असे नाव देण्यात आले असून, या रॅलीद्वारे लोकांना पक्षाशी जोडले जाईल. काँग्रेसने नेहमीच म्हटले आहे की, हा पक्ष आपल्या विचारधारेवर आधारित आहे आणि तो भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेशी सुरू असलेली लढाई लढत राहील.

महत्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts