Income Tax Returns 2023-24 News Income Tax Returns Over 8 Crore ITRS Filed For The Ay 2023 Till Date Milestone Has Been Reached For The First Time

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Income Tax Returns 2023-24: 2023 हे वर्ष संपायला अवघे दोनच दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच केंद्र सरकारसाठी (Central Govt) दिलासादायक बातमी मिळाली आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मूल्यांकन वर्ष 2023 ते 24 साठी आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांनी आयकर रिटर्न (ITR) भरला आहे. आयकर विभागाने ट्वीटरवद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने प्रथमच हा टप्पा गाठला आहे.

आयकर भरणाऱ्यांची सख्या वाढली

अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे यापूर्वी, करदात्यांनी मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये एकूण 7,51, 60, 817 आयटीआर सादर केले होते. सरकारनं सभागृहात 2022-23 या आर्थिक वर्षाची माहिती देताना 7.40 कोटींहून अधिक लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्याचे म्हटले होते. 

कोणत्या वर्षी किती लोकांनी भरला कर

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंत्र्यांच्या उत्तरानुसार, 2018-19 मध्ये ITR फाइल करणाऱ्यांची संख्या 6.28 कोटींवरून 2019-20 मध्ये 6.47 कोटी आणि 2020-21 मध्ये 6.72 कोटी झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या ITR ची संख्या 6.94 कोटींहून अधिक आणि 2022-23 मध्ये 7.40 कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या चार वर्षांत, शून्य कर दायित्वासह आयटी रिटर्नची संख्या आर्थिक वर्ष 2019-20 मधील 2.90 कोटींवरून 2022-23 मध्ये 5.16 कोटी झाली आहे. भारत सरकारला नोव्हेंबर 2023 पर्यंत 17,45,583 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये 14,35,755 कोटी रुपयांचा कर महसूल (केंद्राला मिळणाऱ्या निव्वळ), 2,84,365 कोटी रुपयांचा गैर-कर महसूल आणि 25,463 कोटी रुपयांच्या कर्ज-विरहित भांडवली पावत्यांचा समावेश आहे.

ITR म्हणजे काय?

आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न हा करदात्यांनी भारतीय प्राप्तिकर विभागाला त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा कर रिटर्न फॉर्म आहे. यामध्ये करदात्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी संबंधित तपशील असतो. आयटीआर बहुतेक इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये दाखल केला जातो. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मॅन्युअली फाइल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. करदाता एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, कंपनी किंवा समाज असू शकतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही. जेव्हा करदात्याने दाखल केलेला ITR आधार मोबाईल नंबर किंवा इंटरनेट बँकिंग वापरून तयार केलेल्या OTP द्वारे ई-पडताळणी केली जाते तेव्हा प्रक्रिया पूर्ण होते.

या लोकांना आयकरातून सूट

1. जर एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तर अशा व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. या आकड्याची मर्यादा ओलांडणाऱ्या व्यक्तीला आयटीआर दाखल करावा लागेल.

2. जर एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 80 वर्षांपेक्षा कमी असेल आणि वार्षिक उत्पन्न 3 लाख असेल तर त्या व्यक्तीलाही कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल.

3. यासोबतच जर एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तिचे वार्षिक उत्पन्न 5 लाख असेल तर त्या व्यक्तीला कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल.

महत्वाच्या बातम्या:

Income Tax Return : यंदाच्या वर्षी विक्रमी ITR दाखल, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16 टक्के अधिक ITR चा भरणा

[ad_2]

Related posts