Sindhudurg Submarine Project Special Report Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sindhudurg Submarine Project Special Report : खरंच आणखी एक प्रकल्प गुजरातला ?

सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच नाराजीची लाट पसरली. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले. सत्ताधारी भाजप (BJP) आणि महायुती सरकारवर (Mahayuti) टीकेची झोड उठवली जात असताना आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भूमिका मांडली आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प (Submarine) कुठंच जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक कोणतीच माहिती न घेता भुंकत असल्याची टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी पूर्ण केला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचा चर्चा सुरू झाली. त्यानंतर सत्ताधारी भाजप, महायुती सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली. त्यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. 

[ad_2]

Related posts