Viral News : ‘या’ हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Japan News: आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्यापुढे वेटर मंडळी मेन्यूकार्ड घेऊन येतात. जिथं पदार्थांची आणि विविध प्रकारच्या पेयांची लांबलचक यादीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टरपासून डेजर्टपर्यंत पूर्ण 4 Course Meal इथं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातून प्राधान्यानं आपल्याला नेमकं काय खायचंय ते पदार्थ वेटरला आपण सांगणं अपेक्षित असतं. 

आपण मागवलेले पदार्थ मग, काही वेळानं तयार होऊन आपल्या टेबलावर येतात आणि मग त्याच पदार्थांवर मस्त ताव मारण्यास सुरुवात होते. पण, मुळात असं नाहीच झालं तर? एखाद्या वेळी गर्दी असल्या कारणानं किंवा अनावधानानं वेटर आपण मागवेलला एखादा पदार्थ विसरून जातो किंवा भलताच पदार्थ आपल्यापुढे आणतो. तेव्हा कितीही नाकारलं तरी त्याचा राग आलेला असतो. पण, समजा तुमच्यासोबत असं नेहमीच झालं तर? 

एक अशी संकप्लना जिथं स्मृतीभ्रंश झालेल्यांना मिळतेय नोकरीची संधी… 

जगभरात अनेक संकल्पना दर दिवशी जन्माला येतात. त्यातल्या काही इतक्या अफलातून असतात की आपल्या विचारांना छेद देऊनच त्या निघून जातात. अशीच एक संकल्पना जपानच्या टोकियो येथे राबवण्यात येते. जिथं चुकीच्याच ऑर्डर देण्यासाठी ते ओळखलं जातं. Restaurant Of Mistaken Orders असं त्या हॉटेलचं नाव. 

अभिनेता जावेद जाफरी यानं एक सुरेख असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळं अनेकांनाच या अनोख्या संकल्पनेवर आधारित रेस्तराँचीही माहिती मिळाली. चौकटीबाहेरच्या संकल्पनांसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या जपान या राष्ट्रातील हे रेस्तराँ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. इथं dementia अर्थात स्मृतीभ्रंश झालेले अनेक वृद्धही वेटर म्हणून काम करतात. 

शिरो अगोनी या व्यक्तीनं एकदा स्मृतीभ्रंश झालेल्या वयोवृद्धांच्या एका संस्थेला भेट दिली होती. जिथं त्यांचा एकाकीपणा शिरो यांच्या काळजात कालवाकालव करून गेला. त्यांनाही समाजात एकरुप होण्याची संधी मिळाली पाहिजे अशी आर्त हाक शिरो यांच्या मनानं दिली आणि त्यांनी Restaurant Of Mistaken Orders ची सुरुवात केली. 

इथं काम करणारे महिला आणि पुरुष वेटर हे स्मृतीभ्रंशाच्या अडचणीचा सामना करत आहेत.  पण, एखाद्या तल्लख बुद्धिच्या व्यक्तीलाही लाजवतील असं काम ही मंडळी इथं करत आहेत. इथं काम करणाऱ्या या मंडळींकडून 37 टक्के ऑर्डर या चुकीच्याच दिल्या गेल्या. पण, पदार्थ खावून पोट भरून झाल्यानंतर तिथून निघणारा प्रत्येक ग्राहक हा तितकाच आनंदी असल्याचं पाहायला मिळतं. या रेस्तराँच्या अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या महितीनुसार या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसाठी रेस्तरॉला Cannes Lion हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. 

जपानसारख्या देशात अशा पद्धतीचं रेस्तराँ सुरु करण्यामागे या व्याधीबाबतची जागरुगता पसरवणं या यामागचा मुख्य हेतू आहे. इतकंच नव्हे, तर व्यंग, विकार असणाऱ्यांनाही नोकरीचा हक्क असून, त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे या एक सुरेख आणि तितकाच महत्त्वाचा संदेश या रेस्तराँच्या माध्यामतून संपूर्ण जगाला मिळत आहे. 

Related posts