Nomura On Indian Economy Rural Economy Will Remain Strong In 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nomura on Indian Economy: सर्व जागतिक आव्हानांमध्ये भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) सध्या झपाट्याने वाढत आहे. जग विक्रमी चलनवाढ, भू-राजकीय तणाव आणि पुरवठा साखळी अशा विविध आव्हानांचा सामना करत आहे. अशात भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळू शकतो, असा विश्वास जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने (Nomura) व्यक्त केला आहे.

नोमुराने दिलेल्या माहितीनुसार,  महागाईचा वेग मंदावत आहे. यामुळं मागणी वाढू शकते. 2024 मध्ये विशेषतः ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची संभाव्य कारणेही बँकिंग फर्मने सांगितली आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने निवडणुकीपूर्वी केलेला खर्चही ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करू शकतो. कोविड महामारीच्या काळात ग्रामीण भागातील बचत संपुष्टात आली होती. परंतू ती हळूहळू पूर्वीच्या स्थितीत परत येत आहेत. हे सर्व घटक मिळून यावर्षी ग्रामीण मागणीला पाठिंबा देऊ शकतात.

अर्थव्यवस्थेला मदत मिळणार

नोमुराने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत विकासदर मंदावल्यानंतरही खप मजबूत राहणार आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांनी वाढू शकते. जी पुढील आर्थिक वर्षात 5.6 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही किंमतीचा दबाव कमी झाल्यानं खप मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरु शकते.

महागाई इतकी कमी असू शकते

चालू आर्थिक वर्षात महागाई 5.6 टक्के राहण्याची अपेक्षा नोमुराने व्यक्त केली आहे. जी 2024-25 या आर्थिक वर्षात 4.5 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. निवडणुकीपूर्वी झालेल्या खर्चामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेत अतिरिक्त रोकड येणे अपेक्षित आहे. स्थिरतेची सरकारची अपेक्षा ग्रामीण उपभोगांनाही आधार देऊ शकते. एकूणच, ग्रामीण भागातील मागणी वाढवण्याच्या बाजूने अनेक कारणे आहेत.

गेल्या वर्षी रिकव्हरी दिसून आली

जागतिक बँकिंग कंपन्यांच्या मते, या दिशेने आणखी एक मोठा घटक म्हणजे ग्रामीण वेतन, जे ग्रामीण महागाईपेक्षा सातत्याने जास्त आहे. म्हणजे ग्रामीण भागातील लोक महागाईपेक्षा जास्त कमावत आहेत. या घटकामुळे ग्रामीण भागातही खप वाढू शकतो, ज्यामध्ये 2023 मध्ये आधीच तीव्र सुधारणा दिसून आली आहे. जरी 2023 मध्ये एकूण ग्रामीण मागणी कमकुवत झाली असली तरी, आकडेवारी दर्शवते की ग्रामीण भागातील मागणी वर्षभरात सुधारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

…तर भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर होणार, उदय कोटक यांनी सांगितल्या ‘या’ 7 सूचना

[ad_2]

Related posts