Coronavirus Update 8 January 2024 Mumbai Reports 22 New Cases Of JN1 250 Patients Are Active In State Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या (Coronavirus) JN.1 च्या व्हेरियंटची रुग्णसंख्या ही 22 वर गेलीये. तसेच  राज्यातील JN.1 व्हेरियंटची रुग्णसंख्या ही 250 वर गेलीये. तसेच राज्यात सोमवार 8 जानेवारी रोजी 61 नव्या रुग्णांचे निदान झाले असून 70 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्यात सध्या 882 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आतापर्यंत JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात होते. त्यानंतर आता मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी देखील समोर आली आहे. कोरोनाच्या या रुग्णसंख्येमुळे चिंतेचं वातवरण नसलं तरीही काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

JN.1 प्रकारामुळे चिंता वाढली

कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिंग आणि संशोधन सुरु आहे. कोरोनाचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी म्हटलं आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-19 विषाणूची सवय झाली आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे JN.1 बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात JN.1 अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

JN.1 व्हेरियंटचे गंभीर परिणाम

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. तर, दुसरा परिणाम म्हणजे JN.1 व्हेरियंटचा प्रसार भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोकादायक नवीन कोविड व्हेरियंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो आणि हे मानवासाठी घातक ठरू शकतं.

‘या’ व्यक्तींना नव्या व्हेरियंटचा धोका सर्वाधिक

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहता धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हे धोक्याचं लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका वाढतो. या नवा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोन्ही विषाणूंमध्ये साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य आहेत. या विषाणूचे जसजसे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. तसतसा हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत असल्याचे दिसून येत आहे.

कोविड रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आणि JN.1 उप-प्रकार आढळल्यामुळे, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : 

Corona JN.1 Variant : धोक्याची घंटा! JN.1 चा वाढता प्रसार भविष्यासाठी घातक, 40 हून अधिक देशांमध्ये पसरला नवीन व्हेरियंट

[ad_2]

Related posts