Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! ‘या’ राशीचे लोक होणार धनवान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. यंदाची मकर संक्रांत ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. गेल्या दोन वर्षानंतर यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. यंदा सूर्यदेव 14 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला मकर संक्रांत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार या दिवशी रवि आणि वरीयान योग एकत्र निर्माण होणार आहे. त्याशिवाय 5 वर्षांनंतर मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी आला आहे. हा दुर्मिळ योगायोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. त्या राशीच्या लोकांना अतिशय धनलाभ होणार आहे. (Makar Sankranti 2024 Rare yoga after 77 years of Makar Sankranti People of this zodiac will be rich)

मेष (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांना मकर संक्रांतीपासून यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या करिअरमध्ये तुमची व्याप्ती वाढवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नोकरदारांनाही चांगल्या संधी मिळणार आहे. या काळात तुम्ही परदेशात जाऊ शकता. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले आणि प्रामाणिकपणा नाते बनवणार आहात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले यश प्राप्त होणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

या लोकांना अनेक चांगल्या संधी मकर संक्रांतीपासून मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने मकर संक्रांत खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. या राशीचे लोक जे परदेशात नोकरी करतात त्यांना घसघशीत यश मिळणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. हे पारगमन संपत्तीच्या दृष्टीने खूप चांगले आणि लाभदायक सिद्ध होणार आहे. या काळात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे कमवणार आहात. या काळात तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचे नाते खूप सकारात्मक तयार होणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांना चांगले यश आणि ओळख प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या आघाडीवर नजर टाकल्यास अपेक्षित नफा तुम्हाला मिळणार आहे. व्यावसायिक भागीदारीत काम करणाऱ्यांना या काळात पूर्ण सहकार्य लाभणार आहे. या काळात तुम्हाला उच्च पातळीवरील नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या प्रयत्नातून यश मिळणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांना बढती मिळणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश प्राप्त होणार आहे. तसंच, या काळात तुम्हाला तुमच्या प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला विकास आणि सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. या काळात तुमचं भाऊ आणि बहिणी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार आहात. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित प्रवास करावा लागणार आहे. हे प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. 

मीन (Pisces Zodiac) 

मीन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम संधी प्राप्त होणार आहे. या कालावधीत तुम्ही पूर्णपणे समाधानी असणार आहात. तुम्हाला प्रमोशनही मिळणार आहे. या काळात, अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद मिळणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. नात्यात प्रेमाची भावना निर्माण होणार आहे. तुमचा आत्मविश्वास उच्च पातळीवर असणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts