Ram Mandir Lk Advani Fan Of Pm Narendra Modi Remembered His Journey Of 33 Years Got Emotional Atal Bihari Vajpayee

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Inauguration : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha ) कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केलाय.  भगवान प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर  (Ayodhya Ram Mandir) तयार करण्यासाठी नियतीने आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) निवड केली होती, असेही आडवणी म्हणाले आहेत. 

सुत्रांच्या माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्र धर्म पत्रिकाच्या पुढील विशेष अंकासाठी विशेष लेख लिहिलाय. लालकृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढली, त्याला आता 33 वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. यासंदर्भात त्यांनी आपल्या लेखातून आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या रथयात्रेत लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी जास्त प्रसिद्ध नव्हते. पण त्याचवेळी नियतीने त्यांना भगवान प्रभूरामाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी निवडलं होतं, असे आडवाणी यांनी आपल्या लेखात म्हटलेय.  

नियतीने पंतप्रधान मोदींना आधीचं निवडलं – 

लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या लेखात रथ यात्रेबद्दलच्या अनुवभला उजाळा दिलाय. ते आपल्या लेखात म्हणतात की, ज्यावेळी रथ यात्रेला सुरुवात केली, तेव्हा त्याला इतकं मोठं स्वरुप येईल असे येईल. त्याचं आंदोलनात रुपांतर होईल, असं वाटलं नव्हतं. पण त्याचवेळी भगवान प्रभू श्रीरामाने आपल्या भव्या मंदिर निर्मितीसाठी आपल्या भक्ताला (नरेंद्र मोदी) निवडलं होतं. नियतीने तेव्हाच ठरवलं होतं, आयोध्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामाच मंदिर होणार, त्यासाठी नरेंद्र मोदी यांना निवडलं होतं. 

वाजपेयींची कमी – 

राम मंदिर आंदोलन राजकीय प्रवासाथील सर्वात निर्णायक आणि परिवर्तनकारी असल्याचं लालकृष्ण आडवाणी यांनी सांगतानाच आपल्या अनेक अनुभवांना लेखात उजाळा दिलाय. इतकेच नाही तर लालकृष्ण आडवणी यांनी आपल्या लेखात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केलाय. राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी अटल बिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे आडवणी यांनी सांगितलेय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा! 

राम मंदिराचे स्वप्न साकार करून अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल आडवाणी यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलेय. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रतिनिधित्व करतील, असेही आडवणी यांनी आपल्या लेखात म्हटलेय. 

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आडवणींची उपस्थिती 
 
22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याआधी त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह होते. प्रकृती खराब असल्यामुळे लालकृष्ण आडवाणी 22 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याची शक्यता कमी होती. पण आयएएनएस यांच्याशी बोलताना विश्व हिंदू परिषदचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी आडवाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची पृष्टी दिली. ते म्हणाले की, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टराचे पथक आणि मेडिकलची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.  

[ad_2]

Related posts