( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs ENG Test : येत्या 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ही मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) मोठा धक्का बसू शकतो.
अजिंक्य रहाणेला डच्चू
साऊथ अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन टेस्ट प्लेयर्सला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोहित शर्माची टीका होत होती. त्यामुळे ज्याची भीती होती, तेच घडलं… टीम इंडियाला पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाच्या गोलंदाजांमुळे लाज राखली गेली. अशातच रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध देखील तीच चूक केली आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन तगड्या खेळाडूंना संधी दिली नाही. त्यामुळे आता टीम इंडियाचं कसं होणार? असा सवाल विचारला जातोय.
केएस भरत याला पुन्हा टीम इंडियामध्ये संधी देऊन रोहित युवा खेळाडूंसह नवा संघ उभारत असल्याचं पहायला मिळतंय. तर ध्रुव जुरेल याला देखील संघात स्थान देण्यात आलंय. त्यामुळे आता नव्या छाव्यांमध्ये किती दम आहे, याची खरी कसोटी आता पहायला मिळणार आहे.
इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान.
भारताविरुद्ध इंग्लंड संघ :
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) , टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (IND vs ENG full Schedule)
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)