Religious Places News Increase In Religious Tourism Due To Ram Temple In Ayodhya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. या राम मंदिरामुळं धार्मिक पर्यटनाला नवी उंची मिळाली आहे. धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढ होत आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म MakeMyTrip नुसार, गेल्या दोन वर्षांत धार्मिक स्थळे शोधणाऱ्यांची संख्या सुमारे 97 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 ते 2023 या काळात लोक सहलीसाठी धार्मिक स्थळांना प्राधान्य देत आहेत. यामध्ये अयोध्या आणि तिथे बांधले जाणारे राम मंदिर हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

लोकांचा अयोध्येत येण्याचा कल वाढला

ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रिपच्या आकडेवारीनुसार, सध्या लोक अयोध्येबद्दल सर्वाधिक शोध घेत आहेत. हा आकडा 585 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन संकलित केलेल्या डेटावरुन असे दिसून येते की लोकांची धार्मिक यात्रा करण्याची आवड झपाट्याने वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत लोकांचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलले आहेत. ही विचारसरणी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीने प्रबळ होत आहे.

या धार्मिक शहरांबद्दल जाणून घेण्याची आवड वाढली

ऑनलाइन प्लॅटफॉर्मनुसार, अयोध्या व्यतिरिक्त, 2021 ते 2023 दरम्यान, उज्जैन (359 टक्के), बद्रीनाथ (343 टक्के), अमरनाथ (329 टक्के), केदारनाथ (322 टक्के), मथुरा (223 टक्के) मध्ये लोकांनी पसंत दर्शवली आहे.  द्वारकाधीश (193 टक्के), शिर्डी (181 टक्के), हरिद्वार (117 टक्के) आणि बोधगया (114 टक्के) या शहरांना देखील लोकांनी सर्वाधिक सर्च केलं आहे. 

अयोध्येबाबत सर्वाधिक सर्च 30 डिसेंबरला 

मेक माय ट्रिपच्या म्हणण्यानुसार, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या निर्णयानंतर त्या ठिकाणाविषयी माहिती असलेल्यांची संख्या गगनाला भिडली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी अयोध्येचा शोध घेणाऱ्यांची संख्या 1806 टक्क्यांनी वाढली. 30 डिसेंबरला अयोध्येचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. या दिवशी अयोध्या विमानतळाचे उद्घाटन झाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकावरुन दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

परदेशातील लोकांचीही राम मंदिरात येण्याचा कल वाढला

अयोध्येच्या राम मंदिराचा प्रतिध्वनी परदेशात पोहोचला आहे. भारताच्या सीमेपलीकडेही अयोध्येचा शोध सुरू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 22.5 टक्के शोध अमेरिकेतून आणि 22.2 टक्के आखाती देशांमधून घेण्यात आले. याशिवाय कॅनडा, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियातील लोकांनाही अयोध्या आणि राम मंदिराविषयी जाणून घ्यायचे आहे. उद्घाटनाच्या दिवशी सुमारे 11 हजार मान्यवर अयोध्येला पोहोचतील, असे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Ram Mandir Inauguration : रथ यात्रा काढणारे लालकृष्ण आडवाणी भावूक , म्हणाले “नियतीने मोदींना आधीच निवडलं, 22 तारखेला…”

[ad_2]

Related posts