Indian Air Force Got First Batch Bvr Astra Weapon System Developed By Drdo Beyond Visual Range Attack Know Range Speed And Firepower

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BVR Astra Weapon System : नवी दिल्ली : भारतीय वायूदलाला रविवारी पहिलं स्वदेशी अस्त्र मिसाईल (ASTRA BVR) मिळालं आहे. अस्त्र मिसाइल हे हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र Beyond Visual Range Attack करण्यास सक्षम आहे. या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आलेली. अखेर रविवारी वायू दलात हे मिसाईल सामील करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे, हे क्षेपणास्त्र व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे डागलं जातं. म्हणजेच जिथे पायलट पाहू शकत नाही, तिथेही हे क्षेपणास्त्र अचूक हल्ला करतं आणि विनाश घडवतं. गेल्या वर्षीच तेजस या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

DRDO चं हे Astra क्षेपणास्त्र सुखोई-30 MKI, MiG 29 आणि तेजस या लढाऊ विमानात बसवलं जाऊ शकतं. तेजस MK2, AMCA आणि TEDBF लढाऊ विमानांमध्येही ते बसवण्याची योजना आहे. अस्त्र क्षेपणास्त्रामध्ये ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूज आहे, जे क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक नजर ठेवतं. लक्ष जागचं हललं तरी त्यावर अचूक निशाणा साधून मारा करण्यात हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. अस्त्र क्षेपणास्त्राचं वजन 154 किलो आहे. लांबी 12.6 फूट आणि व्यास 7 इंच आहे. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत 15 किलो वजनाचं शस्त्र वाहून नेऊ शकतं.

अस्त्र क्षेपणास्त्राची पल्ला 160 किमी आहे. ते कमाल 66 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. या क्षेपणास्त्राची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, याचा वेग 5556.6 किमी/तास आहे. म्हणजे, शत्रूला पळून जाण्याचीही संधी मिळणार नाही. अस्त्र क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे ते लक्ष्याच्या दिशेने सोडल्यानंतर त्याची दिशा हवेत मधेच बदलता येते. 

अस्र क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य 

  • अस्र क्षेपणास्त्रात ऑप्टीकल प्रॉक्सीमिटी फ्यूज बसवण्यात आलाय 
  • या फ्यूजमुळे लक्ष्यावर अचूक निशाणा साधणं सहज शक्य होतं
  • अस्र क्षेपणास्त्राचं वजन 154 किलो आहे
  • अस्र क्षेपणास्त्राची लांबी 12.6 फूट आहे
  • अस्र क्षेपणास्त्रात कोणतंही विस्फोटक लावलं जाऊ शकतं. 
  • अस्र क्षेपणास्त्रआपल्यासोबत 15 किलोपर्यंतची हत्यारं घेऊन जाऊ शकतं 
  • या क्षेपणास्त्राची रेंज 160 किलोमीटर आहे
  • या क्षेपणास्त्राची रेंज 350 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. 
  • 66 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं 
  • 5556.6 किलोमीट वेगानं हे क्षेपणास्त्र शत्रूचा पाठलाग करतं. 
  • महत्त्वाची बाब म्हणजे, या क्षेपणास्त्राचं टार्गेट हवेतच बदलता येऊ शकतं

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे काय?

बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (beyond-visual-range missile – BVR) म्हणजे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा प्रकार आहे. ही क्षेपणास्त्रे साधारणपणे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडील म्हणजे 20 नॉटिकल मैल (nmi) किंवा किलोमीटरच्या भाषेत 37 किलोमीटर अंतराच्या पलीकडील लक्ष्य भेदण्यात सक्षम असतात. या प्रकारातील क्षेपणास्त्रांमध्ये असलेल्या ड्युअल पल्स रॉकेट मोटर (dual pulse rocket motors) किंवा बूस्टर रॉकेट मोटरच्या साहाय्याने त्यांना एवढ्या दूरवरील अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम केलं जातं. 

अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेसोबतच या बीव्हीआर क्षेपणास्त्रे त्यांच्यासाठी आधीच निश्चित केलेलं लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सक्षम असतात. तसंच या क्षेपणास्त्रांमध्ये अतिशय दूर अंतरावरील लक्ष्य विमानातून  निश्चित करण्याची यंत्रणाही कार्यान्वित आहे. तसंच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या लक्ष्याने आपलं स्थान बदललं तरीही ही क्षेपणास्त्रे बदललेल्या स्थानावरील लक्ष्याचा (mid-course correction) वेध घेण्यात सक्षम आहेत.

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र असून ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून  नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.  स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून प्रक्षेपण हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

[ad_2]

Related posts