( प्रगत भारत । pragatbharat.com)
Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून घे.
देशातील इतर राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किती वाढ झाली आहे आणि किती दर कमी झाले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Petrol Diesel Rate Today)
देशातील महानगरात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices)
देशातील महनगरांबाबत बोलायचे झाल्यास तर राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकत्तामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेच बदल झाले नाहीयेत. तर, चेन्नईमध्ये मात्र पेट्रोलच्या दरात बदल झाला आहे.
– दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलच्या किंमतीत 89.62 रुपये प्रति लीटर
– मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलच्या किंमतीत 94.27 रुपये प्रति लीटर
– कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत 106.3 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर इतकी आहे
– चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रती लीटर इतकी आहे.
या राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त (Petrol-Diesel Rates)
– बिहारमध्ये पेट्रोल 8 पैशांनी कमी होऊन 109.15 आणि डिझेल 8 पैशांनी कमी होऊन 95.80 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे.
– हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोलच्या दरात 8 पैशांची घट झाली असून 95.62 रुपये आणि डिझेल 8 पैशांनी घटून 87.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
– जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 15 पैशांनी घसरून 100.65 रुपये आणि डिझेल 25 पैशांनी कमी होऊन 85.88 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
– केरळमध्ये पेट्रोल 72 पैशांनी घसरून 107.64 रुपये आणि डिझेल 67 पैशांनी घसरून 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
– पुद्दुचेरीमध्ये पेट्रोल 4 पैशांनी घसरून 95.93 रुपये आणि डिझेल 4 पैशांनी घसरून 86.16 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
– तेलंगणामध्ये पेट्रोल 44 पैशांनी घसरून 111.67 रुपये आणि डिझेल 41 पैशांनी घसरून 99.69 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
– पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 19 पैशांनी कमी होऊन 107.07 रुपये आणि डिझेल 17 पैशांनी घटून 93.73 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.