Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Solar Eclipse 2024 Date And Time (Surya Grahan 2024) : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली गेली आहे. यावर्षी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. त्यातील पहिलं ग्रहण कुठलं आणि ते कधी दिसणार आहे, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. (Surya Grahan 2024 When is the first solar eclipse of the year Will it be seen in India Know date sutak time)

2024 मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी होईल?

या वर्षातील पहिलं सूर्यग्रह हे एप्रिल महिन्यातील 8 तारखेला सोमवारी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण अमावस्या तिथीला असून रात्री 9.12 ते 1:25 पर्यंत असणार आहे. हे ग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात होणार आहे. या दिवशी चंद्र, शुक्र आणि राहू सूर्यासोबत एकत्र येणार आहे. या ग्रहणाचा विशेषत: रेवती नक्षत्र आणि मीन राशीत जन्मलेल्या लोकांवर परिणाम होणार आहे. 

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी कधीपर्यंत आहे? 

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी भारतात वैध नसणार आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होत असतो. या स्थितीत सकाळी 9.12 पासून सुतक कालावधी सुरु होणार असून ग्रहण समाप्तीसह तो संपतो. भारतात ग्रहण दिसणार नसल्याने सुतक काळ आणि मंदिराचे दरवाजे बंद होणार नाही. 

2024 सालचं पहिलं सूर्यग्रहण कुठं दिसणार? 

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ग्रहण हे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, दक्षिण पश्चिम युरोप, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव इत्यादी ठिकाणी दिसणार आहेत. 

2024 चं दुसरं सूर्यग्रहण कधी आहे?

2024 वर्षातील दुसरं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला रात्री 09:13 वाजता सुरू होईल असून गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 ला पहाटे 03:17 वाजेपर्यंत असणार आहे. हे ग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रात होणार आहे. या कारणास्तव, या राशी आणि नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर हे ग्रहण सर्वात जास्त प्रभावित करणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts