मकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Haldi Kunku : मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. कारण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिन्याभरात तुम्ही कधीही हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करु शकता. पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा सोहळा केला जाता? धर्माशास्त्रानुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाभन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो. आज आपण हळदी कुंकवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं, कोणते द्यावं याबद्दल जाणून घेणार आहोत. (Why celebrate Makar Sankranti haldi kunku When is ratha saptami and haldi kumkum gift ideas)

खरं तर पूर्वीच्या काळी महिला घरातील कामं आणि शेतात राबायचा. त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं. त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदीकुंकू कार्यक्रमाचं हे एक निमित्त आहे. या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे, एकमेकांची विचारांची देवाण-घेवाण, जिव्हाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा यानिमित्ताने उद्देश असायचा. 

कुठून आली ही प्रथा?

कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून घेतली आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व होते. इ.स. च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचं उल्लेख तुम्हाला दिसून येईल. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व प्राप्त होते. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात सांगण्यात आलं आहे. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य अधिक आहे. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय असून पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावण्यात येत होतं.  

कुंकूचा पशुबळीशीही संबंध?

कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचं असतं, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत पाहिला मिळते.

कुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानलं जाऊन लागलं. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणे मानलं गेलं. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरु झाली. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते  `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’.

त्यानंतर चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू आजही केलं जातं. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आजही पाळली जाते. 

कसं करायचं हळदीकुंकू?

हळदीकुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदीकुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा. सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावला, त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लीत करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरुन सुहासिनी सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे. तिळगुळ देऊन नमस्कार करा. नववधूने पाच वर्ष हळदीकुंकूच कार्यक्रम करावा. त्यानंतर इच्छेनुसार हा सोहळा करता येतो. शास्त्रानुसार वाण देताना कुंकवाची डबी, टिकली, हिरव्या बांगड्या अशी सौभाग्याचे प्रतिक असणाऱ्या गोष्टी वाण म्हणून द्यात. आज हळदीकुंकूवाचा कार्यक्रम सामूहिक स्वरुपात करण्यात येतो. त्याशिवाय महिला उपयोग अशा विविध वस्तू देण्यात येतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts